सोशल मिडियायवर नेहमीच लोकांना आपल्या रिलमधून हसवत राहणाऱ्या आणि कधी आपल्या रिलमधून सामाजिक संदेश देणारा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अथर्व सुदामेनं एक रिल तयार केला होता. यामध्ये त्याने हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा एक रिल तयार केला होता. मात्र, या रिलवरुन मोठे वादंग निर्माण झाले.
हे ही वाचा
अथर्व सुदामेने एक रील व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओत त्याने एका प्रकारे जात आणि धर्मभेद विसरून सर्वधर्मसमभावाची जोपासना व्हायला हवी असा संदेश दिला होता. त्याने या व्हिडीओत हिंदू-मुस्लीम ऐक्यावरही भाष्य केले होते. मात्र काही लोकांना अथर्व सुदमानेच हा व्हिडीओ आवडला नाही. यामुळे त्याला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. कमेंटसमध्ये अनेकांनी त्याला ट्रोल केलं असून त्यामुळे त्याने आपलं हे रिलच डिलिट केले आहे. आणि त्यानंतर अथर्व सुदामेने माफी देखील मागितली आहे.आक्षेप घेतल्यानंतर मात्र सुदमाने हा व्हिडीओ डिलिट केला असून कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता असे सांगत माफी मागितली आहे.
हे ही वाचा
अथर्वच्या या रीलसंदर्भात ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सुदामेनं केवळ मनोरंजन करावं, अभ्यास नसलेल्या विषयाबद्दल बोलू नये, असं त्यांनी म्हटलंय. अथर्व सुदामेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्या व्हिडिओ तो तो हिंदू-मुस्लिम ऐक्याबद्दल काहीतरी अक्कल शिकवतोय. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तू करमणूक कर, लोकांना हसवं, त्याचं मनोरंजन कर आणि स्वत:चं पोट भर... अभ्यास नसलेल्या गोष्टीत न पडलेलं बरं...असा सल्लाही दवेंनी अर्थवला दिलाय.