भारताचा दिग्गज क्रिकेटपटू, माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. राहुलच्या राजीनाम्या संदर्भातील माहिती संघ व्यवस्थापनाने दिली आहे. खरं तर प्रमुख खेळाडू संजू सॅमसन हा या हंगामात राजस्थान संघाकडून खेळणार नाही, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होती. ही चर्चा सुरू असतानाच, राहुल द्रविडनं राजीनामा दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
टीम इंडियाला आपल्या मार्गदर्शनाखाली टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारे राहुल द्रविड यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयाची माहिती स्वतः राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीनं सोशल मीडियावर दिली.राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनानं ही अधिकृत माहिती दिली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आयपीएल २०२६ च्या पर्वाला सुरुवात होण्याआधीच आपला कार्यकाळ संपुष्टात आणणार आहे.
राजीनाम्याचं कारण काय?
आयपीएल २०२५ मध्येच राजस्थान रॉयल्सच्या संघात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा होती. कर्णधार संजू सॅमसन हा संघ व्यवस्थापनावर नाराज होता. पण नंतर राहुल द्रविडनंच ते वृत्त फेटाळलं होतं. कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचं द्रविडनं त्यावेळी स्पष्ट केले होते.