सिद्धू मूसेवाला या पंजाबी गायकाची हत्या केल्यानंतर अधिक प्रकाशझोतात आलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगला कॅनडात मोठा धक्का बसलाय. हिंसा आणि दहशतवादाला कॅनडामध्ये स्थान नाही असे म्हणत कॅनडा सरकारने मोठा निर्णय घेत लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. या निर्णयामुळे या गँगच्या संपत्तीवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. कॅनडा पोलिसांना या गँगच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अधिक अधिकार मिळाले आहेत.
भारत सरकारने कॅनडाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि या बिश्नोई गँगच्या सदस्यांना भारतात आणण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. आता कॅनडाने या गँगच्या सदस्यांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली. कॅनडामधील खालिस्तान समर्थक कार्यकर्त्यांवर बिश्नोई गँगने हल्ले केले आहेत, ज्यात अनेक हत्यांचा समावेश आहे.
लॉरेंस बिश्नोई गँग ही एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे. त्यांचे मुख्य काम भारतातून चालत असून कॅनडामध्ये ही गँग सक्रिय आहे. या गँगच्या सदस्यांनी विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला आहे, ज्यात हत्या गोळीबार खंडणी वसूली आणि धमकी यांचा समावेश आहे. कॅनडामध्ये विशेषतः शिख समूदायाशी संबंधित व्यक्तींना या गँगने लक्ष्य केले आहे. 2023 मध्ये ब्रिटीश कोलंबियामध्ये शिख कार्यकर्ता हरदीप सिंग निज्जर यांची हत्या करण्यात आली. त्या हत्येमागे बिश्नोई गँग असल्याचा आरोप आहे.
बिश्नोई गँग भारत, कॅनडा, जर्मनी, थायलंड आणि इतर देशांमध्ये सक्रिय आहे. ते ड्रग्स तस्करी, शस्त्रास्त्र तस्करी, आणि मनी लॉन्ड्रिंग सारख्या गुन्ह्यांमध्ये सामील आहेत.