कॉमेडी किंग कपिल शर्माच्या रेस्टॉरंटवर गोळीबार झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कपिल शर्माने काही दिवसांपूर्वीच कॅनडामध्ये या रेस्टॉरंटचं उद्घाटन केलं होतं. कपिलने सरे शहरात कॅप्स कॅफे या नावाने रेस्टॉरंट सुरु केलं होतं. या रेस्टॉरंटवर गोळीबार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेचा कार्यकर्ता आणि दहशतवादी हरजीत सिंग लाडी याने कपिल शर्माच्या काही वक्तव्यांचा हवाला देत या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
हरजीत सिंग लाडी याचा एनआयकडून देखील शोध सुरु आहे. तर दुसरीकडे गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक कार रेस्टॉरंटजवळ येते आणि रेस्टॉरंटच्या काचांवर गोळीबार करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने कारमधून किमान नऊ वेळा गोळ्या झाडल्या.
हरजीत सिंग लड्डी कोण आहे?
दहशतवादी हरजीत सिंग लड्डी पंजाबच्या नवा शहर येथील रहिवासी असून बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेचा कार्यकर्ता आहे. तो सर्वाधिक दहशतवाद्यांच्या शोधात असणाऱ्या एनआयएच्या यादित आहे.