काय सांगता! फक्त हसण्याचे अर्चना पूरन सिंहला मिळते 'इतके' मानधन
काय सांगता! फक्त हसण्याचे अर्चना पूरन सिंहला मिळते 'इतके' मानधन
img
Dipali Ghadwaje
सिनेसृष्टी ते छोट्या पडद्यावरील आपल्या अभिनयाने अर्चना पूरन सिंहने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अर्चनाने खलनायिकेपासून ते विनोदी ढंगाच्या व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. 'मिसेस ब्रिगेंजा' या नावाने ओळखली जाणारी अर्चना पूरन सिंह ही छोट्या पडद्यावरील कॉमेडी शोमध्ये आपल्या गडगडाटी हास्यामुळे देखील ओळखली जाते. कॉमेडी शोमध्ये अर्चनाची चांगली कमाई होते. कपिल शर्माच्या एका एपिसोडसाठी तिला बक्कळ मानधन मिळते. 

एक वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अर्चना प्रत्येक एपिसोडसाठी 10 लाख रुपयांचे मानधन घेते. कपिल शर्माच्या तिसऱ्या सीझनमध्ये अर्चनाने एकूण जवळपास 8 कोटींची कमाई केली होती. अर्चनाची एकूण संपत्ती ही एकूण संपत्ती 31 दशलक्ष डॉलर्स इतकी असल्याचे म्हटले जाते.  

द कपिल शर्मा शोमध्ये कपिल शर्मा आणि अर्चना पूरन सिंह यांच्यात थट्टामस्करी सुरू असते. कपिल शर्मा तिला गंमतीत टोमणे मारतो. तर, अर्चनादेखील संधी साधत त्याला प्रत्युत्तर देत त्याची फिरकी घेते. प्रेक्षकही याचा आनंद घेतात.  

अर्चना पूरन सिंह आपल्या कमालीच्या अभिनयासाठी ओळखली जाते. 'जलवा', 'अग्निपथ', 'सौदागर', 'राजा हिंदुस्थानी', 'कुछ कुछ होता है' सारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. त्याशिवाय, अर्चनाने 'कॉमेडी सर्कस' आणि 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' सारख्या कॉमेडी रिएलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून झळकली होती. 

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group