'या' ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवार संकटाचा ; आजचे संपूर्ण राशिभविष्य जाणून घ्या
'या' ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवार संकटाचा ; आजचे संपूर्ण राशिभविष्य जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
मेष - काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, वादविवाद टाळावेत.

वृषभ - जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

मिथुन - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक लाभ होईल.

कर्क - मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. वाहने जपून चालवा.

सिंह - राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल.

कन्या - जिद्दीने कार्यरत राहाल. धनवर्षा होईल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

तूळ - काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक प्रश्न मिटतील.

वृश्‍चिक - तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सुसंवाद साधाल. हितशत्रूंचा त्रास संभावतो . 

धनू - कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मकर - मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मौल्यवान वस्तू सांभाळा

कुंभ - मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. धनलाभ होण्याची शक्यता.
 
मीन - एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल.आध्यात्मिक प्रगती होईल.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group