महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नामांतर
महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नामांतर
img
वैष्णवी सांगळे
दोन वर्षापूर्वी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं होतं.पण रेल्वे स्थानकाचं नाव मात्र आजपर्यंत तेच होत. पण या रेलवे स्थानकाच्या नावात बदल करण्यात आला आहे. अखेर आता महाराष्ट्र सरकारने केंद्रीय अधिनियमान्वये यासंदर्भात नियम आणि आदेश लागू करत ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव रेल्वे स्थानकाला देण्यासंदर्भात राजपत्र जारी केलंय. आता रेल्वे स्थानकावर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचं नाव झळकणार आहे.


औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर झाल्यानंतरही रेल्वे स्टेशनच्या नावात बदल करण्यात आला नव्हता. यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य सरकारने केंद्रीय अधिनियमान्वये यासंदर्भात नियम आणि आदेश काढत रेल्वे स्टेशनला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे नाव देण्यासंदर्भात राजपत्र जारी केलं आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रातील औरंगाबाद रेल्वे स्टेशनचं नाव हे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे असे होईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group