हृदयद्रावक ! वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी, १० जणांचा मृत्यू
हृदयद्रावक ! वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी, १० जणांचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबु्ग्गा स्थित वेंकटेश्वर स्वामी मंदिरातुन एक दुःखद घटना समोर आली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त आज भाविकांनी वेंकटेश्वर स्वामी मंदिरात गर्दी केली. दरम्यान वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत किमान १० भाविकांचा मृत्यू झाला. तर, अनेक भाविक जखमी असल्याची माहिती आहे. 



कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांनी पहाटेपासून काशीबु्ग्गा स्थित वेंकटेश्वर स्वामी मंदिरात गर्दी गेली होती. प्राथमिक माहितीनुसार, मंदिर संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दी वाढली. ज्यामुळे भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली. नंतर काही वेळातच गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. 

 या अपघातात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. चेंगराचेंगरी झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी आणि पोलिसांनी गंभीर जखमी व्यक्तींना रूग्णालयात दाखल केलं. स्थानिक सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हा आकडा आणखी वाढू शकतो.

घटनेवरून भाविकांकडून मंदिर व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त करत ट्विट केलं आहे. जखमींवर त्वरीत आणि प्रभावी उपचार करण्याचे आदेश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group