नेत्याविरुद्ध साक्ष द्यायला जाताना साक्षीदाराचा अपघात; दोघांचा मृत्यू, जेलमधून रचला हत्येचा कट ?
नेत्याविरुद्ध साक्ष द्यायला जाताना साक्षीदाराचा अपघात; दोघांचा मृत्यू, जेलमधून रचला हत्येचा कट ?
img
वैष्णवी सांगळे
पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याशी संबंधित प्रकरणातील आणि तुरुंगात असलेल्या तृणमूल काँग्रेस नेते शाहजहां शेख यांच्या विरोधात मुख्य साक्षीदाराच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 

भोलानाथ घोष हे त्यांचे पुत्र सत्यजित यांच्यासह बशीरहाट उप-विभागीय न्यायालयात जात होते, कारण शाहजहां शेख यांनी त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या अनेक प्रकरणांपैकी एका खटल्याची सुनावणी होती. या प्रकरणात साक्षीदार असलेल्या भोलानाथ घोष यांच्या मुलाचा आज कोर्टात जात असताना झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. 

स्थानिकांनी सांगितले की, ट्रक अत्यंत वेगाने आला आणि कारला चिरडून जलाशयापर्यंत घसरत घेऊन गेला. ट्रक रस्त्याच्या कडेला पाण्यात लटकलेल्या अवस्थेत आढळला, मात्र ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. प्रकरणात साक्षीदार असलेल्या भोलानाथ घोष यांच्या मुलाचा आज कोर्टात जात असताना झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली असून, हा पूर्वनियोजित हत्येचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.

या अपघातात साक्षीदार भोलानाथ घोष हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी एसएसकेएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. भोलानाथ घोष यांचे मोठे पुत्र विश्वजित घोष यांनी थेट आरोप केला की, हा त्यांच्या वडिलांच्या हत्येचा सुनियोजित कट होता. विश्वजित यांनी आरोप केला आहे की, जेलमध्ये बसून शाहजहां शेखने हे सर्व घडवून आणले. या संशयास्पद अपघातामुळे सीबीआय चौकशीची जोरदार मागणी केली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group