सर्वसामान्यांना मोठा दिलासा! तूरडाळ झाली स्वस्त, किलोमागे वाचणार
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! तूरडाळ झाली स्वस्त, किलोमागे वाचणार
img
Dipali Ghadwaje
सर्वसामान्यांपासून ते श्रीमंताच्या किचनमध्ये लागणाऱ्या तूर डाळीच्या दरात जवळपास वर्षभरानंतर घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ 170 रुपये किलोपर्यंत तर मूगडाळ आणि इतर डाळीही शंभरीपार पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून डाळ गायब झाली होती. मात्र, आता मागील काही दिवसांपासून तूरडाळीचे दर घसरले आहेत. किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.

सध्या तूर डाळीच्या दरात मोठी  घसरण झाली आहे. आता दूर डाळीचे दर कमी होऊन 130 रुपये प्रती किलोपर्यंत कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळत आहे. मात्र दुसरीकडं शेतकऱ्यांना या दर घसरणीचा फटका बसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.  

दरम्यान गेल्या वर्षी बुरशीजन्य आजार आणि अति पावसामुळं तूर पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं  तूर उत्पन्नात  मोठी घट  झाली होती. त्याचा परिणाम बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला होता. बाजार समितीमध्ये तूर आवक कमी झाल्यानं तुरीच्या दरांवर परिणाम झाला होता. त्यामुळं 7 हजार रुपये प्रती क्विंटल असलेली तूर टप्प्या टप्प्याने 14000  प्रती क्विंटलवर पोहचली होती. त्यामुळं  सर्वसामन्यांनावाढलेल्या दरानं तूर डाळीची खरेदी करावी लागत होती. या वाढत्या महामागामुळं जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला होता.

सध्या खरीपात लागवड केलेली नवीन तूर बाजारात दाखल होत आहे. अशातच तुरीच्या दरातही घसरण होत आहे. अशातच केंद्र सरकारनं  विदेशातून तूर आयात केली आहे. याचा परिणाम दरांवर झाल्याचं चित्र दिसत आहे. असे असले तरी तुरीचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

आधी कमी पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पावसाचे संकट आणि त्यानंतर बुरशीजन्य आजार आणि कीड आळ्याचा  प्रादुर्भावामुळं तूर पिकाला मोठा फटका  बसला होता. त्यातून बचावलेल्या तुरीवर शेतकऱ्यांच्या आशा लागल्या होत्या.  मात्र, बाजार समितीमध्ये 8 हजार 500 रुपयापर्यंत तुरीला  दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतं आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group