'बिग बॉस मराठी' सीझन 5 चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी संजना चव्हाण आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याची चाहुल लागली की, काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. संजनानं तिच्या अधिकृत हँडलवरुन एक फोटो शेअर केलाय. त्यामध्ये तिचा बेबी बंप दिसतोय. त्यामुळे सूरज आणि संजनावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.
संजना चव्हाणने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. यामुळेच तिच्या सोशल मीडिया पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या फोटोसोबत तिने देवकी चित्रपटातील गाणं जोडले आहे. त्यामुळे ही पोस्ट आणखी चर्चेत आली आहे. सूरज आणि संजना यांनी 29 नोव्हेंबर 2025 रोजी लग्न केलं होतं. लग्नाला अवघे काही महिने झाले असताना ही पोस्ट समोर आल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
काही सोशल मीडिया युजर्सच्या मते, संजनाचा हा लूक डोहाळे जेवणाचा असू शकतो. तर काहींनी हा फोटो AI जनरेटेड असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संजना चव्हाणने या पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद ठेवल्यामुळे चाहत्यांच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. या फोटोसोबत एक भावनिक ऑडिओदेखील जोडण्यात आला आहे. त्यात, अजून तू माझ्या पोटात आहेस... अशा शब्दांत आई होण्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. यामुळेच चाहत्यांना ही पोस्ट ‘गुड न्यूज’कडे इशारा करत असल्याचं वाटत आहे.