तुमच्या घरात कोणाला व्हिटॅमिन ए ची कमतरता आहे; काळजी घ्या
तुमच्या घरात कोणाला व्हिटॅमिन ए ची कमतरता आहे; काळजी घ्या
img
दैनिक भ्रमर
चांगल्या आरोग्यासाठी अनेक जीवनसत्त्व, प्रथिने आवश्यक असतात. त्यातील एक व्हिटॅमिन ए. हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. डोळ्यांसोबतच हृदय, त्वचा, फुफ्फुसे आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी देखील खूप महत्त्वाचे आहे.

आहारात याच्या कमतरतेमुळे दृष्टी कमी होणे, प्रजननक्षमतेशी समस्या, कमकुवत प्रतिकारशक्ती, त्वचेशी संबंधित समस्या आणि श्वसन संक्रमणाचा धोका वाढतो. आहारात व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांचा समावेश केल्यास पुढील धोका टळू शकतो.

हल्ली लहान मुलांचा वाढत्या स्क्रिन टाइममुळे मुलांना डोळ्यांचा त्रास अधिक होतो. त्यासाठी मुलांच्या आहारात व्हिटॅमिन ए चा समावेश करायला हवा.

मुलांच्या खाण्यात खालील पदार्थांचा समावेश केल्यास त्यांना व्हिटॅमिन ए मिळू शकेल 
  • गाजर
  • रताळे
  • पालक
  • आंबा
  • पपई
टीप : हे माहितीसाठी आहे. परस्पर उपचार घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या.


इतर बातम्या
Join Whatsapp Group