उन्हाळा सुरू होताच शरीरातील उष्णता वाढते, थकवा जाणवतो व सतत तहान लागते. याकाळात भरपूर पाणी पिणे आणि लाइट खाणे योग्य असते. काळे छोटे चिया सीड्स देखील उन्हाळ्यात खुप फायदेशीर ठरतात.
चिया सीड्समध्ये ओमेगा-3, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटर हे शरीरासाठी आरोग्यदायी ड्रींक ठरू शकते. ते उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवतात आणि उष्णतेपासून संरक्षण करतात.
चिया सीड्स वॉटरचे फायदे
१. शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतो- उन्हाळ्यात गरमीमुळे घाम येतो, ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनचा त्रास उद्भभवतो. चिया सीड्स हे पोटात जाऊन शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.
२. उष्णतेपासून संरक्षण करते- चिया सीड्समध्ये थंड प्रभाव असतो. उन्हाळ्यात ते नियमित प्यायल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि उष्णतेपासून संरक्षण होते.
3. उर्जा वाढवते- उन्हाळ्यात खुप प्रमाणात थकवा आणि कमजोरी जाणवते. चिया सीड्समध्ये असलेले जीवनसत्व शरीराला ऊर्जा देतात, ज्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते.
४. वजन नियंत्रणात रहोते- चिया सीड्स वॅाटरने पचन मंदावते, ज्यामुळे पोट भरलेले राहते व वारंवार भूख लागत नाही. हे वजन नियंत्रणात ठवण्यास मदत करते.
५. हाडांची मजबूती बनवणे- चिया सीड्समध्ये खुप प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम असतात, जे हाडांसाठी उपयुक्त असतात. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातून मिनरल्स बाहेर टाकले जातात, दररोज ‘हे’ पेय प्यायल्याने हाड बळकट होण्यास मदत होते.
६. पचनशक्ती वाढवते- चिया सीड्समध्ये फायबर असते, जे पचनसंस्था सुधारवण्यास मदत करते.
असे बनवा चिया सीड्स वॉटर
१. एका ग्लास पाण्यात 1 चमचा चिया सीड्स घाला.
२. चिया सीड्सना पाण्यात 10-15 मिनिटे भिजू द्या (चिया सीड्स जेल सारखे होऊ लागतील)
३. मग ते चांगले ढवळून घ्या (हवअसल्यास त्यात लिंबाचा रस किंवा मध मिसळा)
४. दररोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी दिवसातून २ वेळा हे प्यावे.