वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विठ्ठलाचं दर्शन मिळणार २४ तास
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विठ्ठलाचं दर्शन मिळणार २४ तास
img
Dipali Ghadwaje
विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पायी दिंडीने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर ट्रस्टने विठ्ठलाच्या दर्शनासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन २४ तास घेता येणार आहे.

त्यामुळे आता आषाढी यात्रा कालावधीत परंपरेनुसार श्री विठ्ठलाचे दर्शन २४ तास सुरु राहणार आहे. दरम्यान २६ जुलैपर्यंत विठ्ठलाचं मंदिर २४ तास सुरू असणार असल्याचा निर्णय विठ्ठल मंदिर ट्रस्टने घेतलाय. ट्रस्टच्या या बैठकीत मु्ख्यमंत्र्यांना लवकरच विठ्ठलाच्या पुजेचं निमंत्रण दिलं जाणार असल्याचा निर्णयदेखील घेण्यात आलाय. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group