ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडपासून पुढे जेजुरीकडे निघाला आहे. यादरम्यान दिंडी क्रमांक ७८ मधील स्वयंपाक सुरू असताना घरगुती सिलेंडरला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच धावपळ उडाली होती. मात्र, वारकरी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली .
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सासवडकडून जेजुरीकडे रवाना झाली आहे. या दरम्यान सकाळी साधारण दहाच्या सुमारास दिंडी क्रमांक ७८ मध्ये स्वयंपाक सुरू असताना घरगुती सिलेंडरने अचानक पेट घेतला. स्फ़ोटाच्या आवाजाने एकच खळबळ उडाली. सिलेंडरने पेट घेतल्याने आग लागण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, वारकऱ्यांनी सिलेंडरवर माती टाकून आग विजवण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर सोबत असलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांना याबाबतची माहिती देण्यात आली. जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. सिलेंडरचा मोठा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. वारकरी आणि अग्निशामक दलाच्या जवानांमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. जेजुरी रस्त्यावरील वाळुंज फाटा येथे हा प्रकार घडला आहे.
घडलेल्या घटनेमुळे पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने उपस्थितांनी अग्निशामक दलाच्या जवानांचे आभार मानले.