स्वप्नील कुसळेने रचला इतिहास ; नेमबाजीत कांस्यपदक मिळवून महाराष्ट्राची मान उंचावली
स्वप्नील कुसळेने रचला इतिहास ; नेमबाजीत कांस्यपदक मिळवून महाराष्ट्राची मान उंचावली
img
Dipali Ghadwaje
कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक मिळवून नवा इतिहास रचला आहे. स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. या यशाने महाराष्ट्राची मान उंचावली असून देशभरातून स्वप्निलचे कौतुक होत आहे. 

भारताच्या स्वप्नील कुसळेने आपले पहिले ऑलिम्पिक खेळत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. पात्रतामध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या स्वप्नीलने ४५१.४ गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. 

या खेळांमधील भारताचे हे तिसरे कांस्यपदक आहे. याआधी मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात सरबज्योत सिंगसह कांस्यपदक जिंकले होते. 

कोल्हापूरच्या कांबळवाडी गावातील स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक पटकावत नवा इतिहास रचला आहे. या ऑलिम्पिकमधील भारताचे हे तिसरे कांस्य पदक आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group