विनेश फोगाट रुग्णालयात दाखल, काय घडलं वाचा ...
विनेश फोगाट रुग्णालयात दाखल, काय घडलं वाचा ...
img
दैनिक भ्रमर

विनेश फोगाटला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विनेश फोगाटला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. हा तिच्याबरोबरीने सगळ्या भारतासाठी मोठा धक्का आहे.  भारताची महिला पैलवान विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. मात्र अंतिम फेरीपूर्वी, आज सकाळी वजन केले असता केवळ काही ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं. 

यामुळे विनेश फोगाटच्या ऑलिम्पिक पदक विजयाचं स्वप्न भंगलं. इतक्या जवळ येऊन पदक जिंकण्याचं स्वप्न अपुरं राहिल्यानं विनेश फोगाट चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याची माहिती मिळत आहे. विनेशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय.

विनेशने काल जपानच्या युई सुसाकी, युक्रेनच्या ओकसाना लिवाच आणि गुजमॅन लोपेजला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. विनेशचा फॉर्म खूपच जबरदस्त होता. ती आज नक्की फायनल जिंकणार असा विश्वास होता. पण त्याआधी मर्यादेपेक्षा जास्त वजन भरल्यामुळे तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं.

या बातमीने सगळ्या देशाच मन मोडलं. विनेशलाही याच खूप दु:ख झालं आहे. विनेश बेशुद्ध झाली आहे. तिला पॅरिसच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ड‍िहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे विनेश बेशुद्ध झाली. तिच्यावर पॅरिसमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिला IV फ्लूइड देण्याचा सल्ला दिलाय. विनेशने तिचं वजन कमी करण्यासाठी रात्रभर बरीच मेहनत केली. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊन ती बेशुद्ध झाली. विनेश 50 किलो वजनी गटात खेळत होती. पण काल रात्री तिचं वजन 52 किलो होतं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group