मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही  ? मोबाईलच्या एका क्लिकवर शोधा यादीतील नाव अन् मतदान केंद्र, जाणून घ्या प्रक्रिया
मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही ? मोबाईलच्या एका क्लिकवर शोधा यादीतील नाव अन् मतदान केंद्र, जाणून घ्या प्रक्रिया
img
दैनिक भ्रमर
मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही  ? मोबाईलच्या एका क्लिकवर शोधा यादीतील नाव अन् मतदान केंद्र,, जाणून घ्या प्रक्रिया 

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. पर्वा म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी  राज्यात मतदान प्रक्रिया एकाच टप्पयात पार पडणार आहे याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं आता मोबाईलवर मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.   तुमचे नाव मतदार यादीतून कापले गेले तर नाही ना ? याची मतदानापूर्वी खातरजमा करता येते.

 मतदार यादीत आहे की नाही हे कसे चेक करायचं ते आपण आता येथे पाहूया

सर्वात आधी आपल्याला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर  https://www.eci.gov.in वर लॉग इन करावे लागेल. जसे तुम्ही ही वेबसाईट उघडल्यानंतर होम पेजवर पोहचाल. त्यानंतर डाव्या बाजूला थोडे खाली गेल्यानंतर Search Your Name in Voter List हा पर्याय दिसू लागेल. त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आणखी एक पेज तुमच्यासमोर संगणकावर उघडेल. ज्यात तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. त्यानंतर राज्याची निवड केल्यानंतर एक आणखी पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर तेथे आपला EPIC (Electors Photo Identity Card) नंबर टाकावा. त्यानंतर कॅप्चा विचारला जाईल. कॅप्चा भरल्यानंतर तुमचे नाव जर मतदार यादीत दिसेल त्यावर तूमची संपूर्ण माहिती देखील दिसेल. तुम्ही या पेजचे प्रिंटआऊट देखील काढू शकता. ज्यात तुमच्या पोलिंग बूथची आणि अन्य माहिती दिलेली असेल.

मोबाईल क्रमांकाने ही चेक  करता येणार यादीतील नाव  
जर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक मतदार यादीत नोंदविला असेल तर मोबाईल नंबर नोंदवून देखील तुम्ही तुमचे नाव मतदान यादीत चेक करु शकता. येथे माहिती भरल्यानंतर खाली दिलेला कॅप्च कोड नोंदवावा लागेल. त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करावे लागेल.

SMS आणि टोल-फ्री नंबरवरुन तपासू शकता.

मतदार यादीत आपले नाव आहे की नाही ? हे आपण SMS द्वारे देखील चेक करु शकता. यासाठी आपल्याला ‘ECI <space> Voter ID’ आणि आपला EPIC नंबर टाकावा लागणार आहे. ही सेवा टोल फ्री आहे. याद्वारे तुम्हाला तुमच्या नावाची मतदार यादीतील स्थिती सांगितली जाईल.तुम्ही 1950 नंबर वर कॉल करुन देखील ही माहिती मिळवू शकता. ही सेवा मोफत आहे. या टोल फ्री नंबर वरुन तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही याची पडताळणी करु शकता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group