स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत वार्षिक क्रमवारीत येवला बाजार समितीचा नाशिक जिल्ह्यात चौथा क्रमांक
स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत वार्षिक क्रमवारीत येवला बाजार समितीचा नाशिक जिल्ह्यात चौथा क्रमांक
img
दैनिक भ्रमर
येवला (दिपक सोनवणे) :-  मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत पणन संचालनालयाकडून राज्यातील ३०५ कृषि उत्पन्न बाजार समित्यांची सन २०२२-२३ च्या कामगिरीच्या आधारे पिंपळगांव बसवंत व नामपूर बाजार समिती पाठोपाठ ४ था  क्रमांक पटकाविला आहे.

प्रकल्पाअंतर्गत शेतमाल विक्री व्यवस्थेमध्ये बाजार समितीत असलेल्या पायाभूत सुविधा, आर्थिक निकष, वैधानिक कामकाज
निकष व इतर निकष असे एकुण ३५ निकषांची मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांचे मार्गदर्शनानुसार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, येवला व लेखापरिक्षक यांचे मार्फत तपासणी करुन २०० गुणांच्या आधारावर ही क्रमवारी ठरविण्यात आली आहे. येवला बाजार समितीस विविध
सुविधांमुळे १४६ गुण मिळाले असून ४ थे स्थान प्राप्त झाले आहे.

याबाबत येवला बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे व सचिव के. आर. व्यापारे यांनी समाधान व्यक्त केले आहे व यापुढील काळातही बाजार समिती शेतकरी व व्यापारी बांधवांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यास कटिबध्द असून गुणांकन पध्दतीत वाढ करुन राज्यातील पहिल्या १० मध्ये येण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

या कामगिरीत सर्व सदस्य, शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी तसेच बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group