लासलगाव :- माथाडी मापारी कामगारांच्या हमाल तोलाई वराई कपात आणि लेव्ही संदर्भात सर्वमान्य तोडगा निघे पर्यंत माथाडी कामगार कामकाजात सहभाग होत नसल्याने पुढील सूचना होईपर्यंत दिनांक ४ एप्रिल पासून लासलगाव बाजार समितीत शेतीमालाचा लिलाव बंद राहतील असे कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केले आहे.
माथाडी-मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई व वाराई कपातीसह लेव्ही संदर्भात सर्वमान्य तोडगा निघेपावेतो माथाडी-मापारी कामगार दैनंदीन वजनमापाचे कामकाजात सहभागी होणार नसलेबाबत माथाडी-मापारी कामगारांनी आज पत्रान्वये बाजार समितीस कळविले आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून उद्या पासून पुढील आदेश होईपावेतो लासलगांव मुख्य बाजार आवारावरील कांदा, भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव पुढील सुचना मिळेपावेतो बंद राहतील, असे बाजार समितीने कळविले आहे.