कांदा व्यापारी व पालकमंत्री भुसे यांच्या बैठकीत तोडगा नाहीच; चर्चा निष्फळ
कांदा व्यापारी व पालकमंत्री भुसे यांच्या बैठकीत तोडगा नाहीच; चर्चा निष्फळ
img
दैनिक भ्रमर
नासिक - कांदा व्यापारी आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी पालकमंत्री दादा भुसे यांच्यात आज झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. व्यापाऱ्यांनी राज्य सरकारकडे वेळ मागितला आहे. दरम्यान या बैठकीत व्यापाऱ्यांवर कारवाईबाबत सर्व अधिकार हे पणन महामंडळाला देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

कांद्याला लागू केलेली 40 टक्के निर्यात बंदी तातडीने कमी करावी तसेच बाजार समिती यांची फी कमी करावी यासह विविध मागण्यांसाठी बुधवारपासून नाशिक जिल्ह्यातील सतरा बाजार समितीमध्ये कांदा व्यापाऱ्यांनी लिलावास भाग घेण्यास बंदी केली.

त्यामुळे कांद्याचे लिलाव हे बुधवारपासून बंद आहे आज गुरुवारी दुसऱ्या दिवशी देखील कांद्याचे लिलाव सुरू होऊ शकले नाही. पण यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रयत्न केले. काल व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केल्यानंतर तातडीने आज गुरुवारी याबाबत बैठक घेण्यात आली.

पालकमंत्री दादा भुसे तसेच कांदा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि प्रशासनिक अधिकारी यांची नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली पण या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यापाऱ्यांना 26 तारखेला पणनमंत्र्यांनी बैठक ठेवलेली आहे.

या बैठकीमध्ये आपल्या मुद्दे मांडावेत असे सांगून हे सर्व मुद्दे केंद्र आणि राज्य सरकारची निगडित आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवरती लक्ष घालेल आणि ते सोडवतील असा विश्वास दादा भुसे यांनी यावेळी व्यक्त केला पण यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी सणासुदीचा महिना असल्यामुळे व्यापाऱ्यांनी बंद मागे घ्यावा असे आवाहन केले. त्यावर कांदा व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सभासदांची चर्चा करण्यासाठी उद्या शुक्रवार पर्यंतचा वेळ मागितला आहे या वेळेत निर्णय होईल अशी अपेक्षा पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान दुसरीकडे व्यापाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार ही कायम आहे कारण व्यापाऱ्यावर कारवाई करायची की नाही याबाबतचे सर्व अधिकार हे पणन मंडळाला दिले आहे असे या बैठकीमध्ये सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

नाफेड व इतर संस्थांच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले की आज सायंकाळपर्यंत किती कांदा खरेदी झाला याबाबतची माहिती ही सरकारला कळवायची आहे त्यामुळे त्यासाठीने संप मागे घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली पण पालकमंत्री दादा भुसे यांच्याबरोबर गुरुवारी झालेली व्यापारी असोसिएशनची बैठक ही अखेर निष्फळच  ठरली

इतर बातम्या
Join Whatsapp Group