दिल्लीत आज कांदा प्रश्नी तोडगा निघणार? केंद्रीयमंत्री गोयल घेणार बैठक
दिल्लीत आज कांदा प्रश्नी तोडगा निघणार? केंद्रीयमंत्री गोयल घेणार बैठक
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :  मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या कांदा व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांच्याकडे आज सायंकाळी बैठक होणार आहे. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत कोणत्याही तोडगा निघाला नाही.

नाशिकमध्ये मागील सात दिवसांपासून कांदा व्यापारी नाशिक जिल्ह्यातील सतरा बाजार समितीमध्ये लिलावात सहभागी झाले नाही. त्यामुळे एक प्रकारे त्यांनी बंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. परंतु त्यात तोडगा निघाला नाही तर आज मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नाशिकचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री दादा भुसे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या व्यापाऱ्यांसमवेत बैठक झाली. पण या बैठकीमध्ये व्यापारी हे निर्यात मूल्य शुल्कावर कायम राहिल्यामुळे कोणत्याही प्रकारचा निर्णय यामध्ये होऊ शकला नाही.

यावर निर्णय करण्यासाठी म्हणून आज सायंकाळी सात वाजता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिल्ली येथे या व्यापाऱ्यांना बोलावलं असून राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे निवडक व्यापाऱ्यांसह दिल्ली येथे गेले आहेत. त्यांची या ठिकाणी बैठक होईल त्यानंतर नऊ वाजेपर्यंत या बैठकीचा तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group