कांदा व्यापाऱ्यांचा संप अखेर मागे; ना. भारती पवार व दादा भुसे यांच्या मध्यस्थीला यश
कांदा व्यापाऱ्यांचा संप अखेर मागे; ना. भारती पवार व दादा भुसे यांच्या मध्यस्थीला यश
img
दैनिक भ्रमर
नाशिक - मागील तेरा दिवसासांपासून सुरू असलेल्या कांदा व्यापाऱ्यांचा संप हा मागे घेण्यात आला असून या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला एक महिन्याची मुदत देण्यात आल्याची माहिती कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री भारती पवार व पालकमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या मध्यस्थीला अखेर यश आले आहे.

नाशिक जिल्हा कांद्याचे माहेरघर असल्यामुळे सातत्याने या ठिकाणी घडामोडी घडत असतात. विंचूर आणि निफाड या दोन बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झाले होते. पण त्याचबरोबर आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भरती पवार यांच्या उपस्थितीत कांदा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक झाली.

या बैठकीत मागील तेरा दिवसांपासून सुरू असलेला कांदा व्यापाऱ्यांचा बंद हा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी अधिकृत घोषणा बैठकीनंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

दरम्यान या सर्व विषयावर कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारने व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी काही मुदत मागितली होती. त्यामुळे आम्ही एक महिन्याची मुदत दिले आहे. तसेच सध्या शेतकऱ्यांचे जे हाल होत आहे ते देखील डोळ्यासमोर ठेवून व्यापारी असोसिएशनच्या बैठकीमध्ये एक मुखाने निर्णय घेऊन सरकारला मुदत दिली जात आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने आमचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी केली असून  राज्याचे बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे उद्यापासून कांद्याचे लिलाव हे सुरू होणार आहे . पण एक महिन्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे असे देवरे यांनी स्पष्ट केले.
इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group