कांदा आता सर्वानाच रडवणार, शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही फटका बसणार
कांदा आता सर्वानाच रडवणार, शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही फटका बसणार
img
Dipali Ghadwaje
ऐन सणासुदीत कांदा सर्वसामान्यांच्या कांद्याने पुन्हा एकादा ग्राहकांच्या डोळ्यात आश्रू आणले आहे. किरकोळ बाजारात कांदा 80 रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. परंतु ग्राहकांना दिलासा देण्याच्या नावाखाली केंद्र सरकार कांदा विक्रीतून मालामाल होत आहे.

केंद्र सरकारला कांद्यातून 7 ते 18 रुपये किलोमागे नफा मिळत आहे. लागवडीपासून ते साठवणूकपर्यंत नऊ महिने कांदा सांभळणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ पाच रुपये ते दहा रुपयांचा फायदा मिळत आहेत. कांद्याचे दर वाढले असले तरी तो फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहचला नाही.

कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत कांद्याची खरेदी करण्यात येते.

यंदा नाफेड, एनसीसीएफ या संस्थेच्या मार्फत 16 ते 30 रुपयांपर्यंत 24 रुपये सरासरी दराने पाच लाख मॅट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती. आज शेतकऱ्यांच्या कांद्याला चार हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. परंतु वाढलेले कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी नाफेडचा कांदा बाजारात आणला जात आहे. दिल्ली येथील आझादपूर बाजारपेठेत नाफेडचा कांदा विक्री केला जात आहे. या कांद्याला 35 रुपये ते 37 रुपये इतका दर मिळत आहे.
 
 
onion |
इतर बातम्या
Join Whatsapp Group