महत्वाची बातमी : लासलगावला उद्यापासून कांदा लिलाव सुरू
महत्वाची बातमी : लासलगावला उद्यापासून कांदा लिलाव सुरू
img
Dipali Ghadwaje
लासलगाव :- कांदा उत्पादकांची गैरसोय थांबविण्यासाठी गुरूवार दि. 24 पासून लासलगावसह विंचूर येथेही कांदा   लिलाव पूर्ववत सुरू होत आहे. शेतकऱ्यांनी आपला कांदा व इतर शेतमाल विक्रीसाठी आणावा, असेही आवाहन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी केले आहे.

सभापती क्षिरसागर यांच्यासह  उपसभापती गणेश डोमाडे ,संचालक मंडळ व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी बुधवारी लासलगाव बाजार समितीमध्ये सकाळी साडेदहा वाजेपासून व्यापारी वर्गाशी दीर्घकाळ चर्चा केल्यानंतर बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांच्या प्रयत्नांना यश आले असून उद्यापासून लासलगाव बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू होणार आहेत.

लासलगाव बाजार समितीचे संचालक बाळासाहेब दराडे प्रवीण कदम ,रमेश पालवे या परिवाराच्या वतीने ओम प्रकाश राका ,मनोज जैन,नितीन जैन हे उपस्थित होते. 

लासलगावचे कांदा बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी जास्त बाजारपेठ आहे.  लासलगाव येथील बाजार समितीच्या लिलावात जे भाव जाहीर होतात, त्यावरच राज्यात देशात आणि परदेशात देखील कांदा बाजारभाव घोषित होत असतात. त्यामुळे अन्य बाजार समितीच्या तुलनेमध्ये लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे होते. 

या पार्श्वभूमीवर काल सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी  ना. धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली होती. लासलगाव बाजार समिती कांदा लिलाव उद्या सुरू होणार असले तरी विंचूर बाजार समितीचे व्यवहार झालेले आहेत. उद्यापासून शेतकरी वर्गाने आपला कांदा विक्रीसाठी आणावा, याची सर्व शेतकरी व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, आवाहन करण्यात आले आहे.

शासनाने कांदा निर्यातीवर 40टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतांना शेतकरी व व्यापारी यांना कुठलीही वेळ न दिल्याने नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन यांनी कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र गुरूवार दि. 24 पासून  बाजार समित्यांमधील कांद्यासह  इतर शेतीमालाचे लिलाव चालू राहतील, याची दक्षता बाजार समिती प्रशासनाने घ्यावी. आवश्यकता असल्यास महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 व त्याखालील नियम, 1967 मधील तरतूदीनुसार बाजार समितीने  लिलावात भाग न घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश बाजार समित्यांना देण्यात आले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group