आकाशातून वस्तू पडल्याने  शेतकऱ्यांमध्ये घबराट ...निफाड तालुक्यातील कोटमगाव येथील घटना
 आकाशातून वस्तू पडल्याने  शेतकऱ्यांमध्ये घबराट ...निफाड तालुक्यातील कोटमगाव येथील घटना
img
DB

लासलगाव :  निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील कोटमगाव येथे वनसगाव रोडवरील रंगनाथ वारुळे यांच्या गट नंबर 362 मध्ये शेतात आकाशातून बॅटरी व लाईट असलेली वस्तू पडल्याने वारुळे वस्ती वरील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दरम्यान याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी लासलगाव पोलिसांना दिली, याबाबत लासलगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. 

यावेळी हवामानाची माहिती मिळविण्यासाठी हवेत सोडले जाणारे यंत्र तुटून पडल्याची माहिती देताच शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला हे यंत्र लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी संबधित विभागाशी संपर्क सुरु केला आहे . 

इतर बातम्या
Join Whatsapp Group