जप्त केलेला डंपर प्रांत अधिकाऱ्याचा खोटा आदेश दाखवून पळविला; नाशिक जिल्ह्यातील प्रकार
जप्त केलेला डंपर प्रांत अधिकाऱ्याचा खोटा आदेश दाखवून पळविला; नाशिक जिल्ह्यातील प्रकार
img
दैनिक भ्रमर
लासलगाव (वार्ताहर) :- अवैधरीत्या गौणखनिजाची वाहतूक केल्याबद्दल गेल्या जुलैमध्ये जप्त केलेला डंपर प्रांत अधिकाऱ्याचे बनावट आदेश दाखवून पळवून नेल्याप्रकरणी एका डंपरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की विंचूर येथील महसूल मंडल अधिकाऱ्याने मुरूम गौणखनिजाने भरलेला अनधिकृत डंपर क्रमांक एमएच 04  सीडब्ल्यू 4992 हा गेल्या दि. 4 जुलै रोजी जप्त करून लासलगाव बस आगारात उभा केला होता. तो सोडविण्याऐवजी डंपरमालक राजू चिंतामण ढोकळ यांनी निफाडच्या प्रांत हेमांगी पाटील यांचा बनावट आदेश तयार करून तो बस आगाराच्या सुरक्षारक्षक यांना दाखवून फसवेगिरी करून डंपर पळवून नेला.

या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात सिन्नर येथील डंपरमालक राजू चिंतामण ढोकळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोकळ करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group