तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे पडले महागात
तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे पडले महागात
img
दैनिक भ्रमर
लासलगाव : पिंपळगाव येथील रजा नगर भागात अमीर युनूस पठाण या युवकाचा वाढदिवसाचा केक तलवारीने कापतानाचे छायाचित्र निदर्शनास आल्याने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलिसांनी तातडीने केलेल्या शोध मोहिमेत गंभीर दुखापत करणारे शस्त्र त्यात चाकू, सुरे तलवार यासारखे हत्यार जप्त करून तिघांना अटक केली आहे. तलवार कुकरीसह धारदार शस्त्रांचा साठा लासलगाव पोलिसांना सापडल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार पोलीस नाईक उत्तम महादु गोसावी यांनी फिर्याद दिली असून  फिर्यादीत सहा. पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे लासलगाव, पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ, कदम, डगळे, सुजय बारगळ, तळेकर अशांना यांनी  दि. 05 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास  वाढदिवसात लोखंडी धातुच्या तलवारीचे प्रदर्शन केल्याचे दिसले. 

अमीर युनीस पठाण यासह अदनान युनिस पठाण व त्याचे मित्र अभिर पठाण, परवेज नासिर पठाण, रिहान सलिम शेख, कैफ शकिल पठाण, इम्तियाज सलिम शेख, अजहर अशरफ शेख, अरबाज रफिक शेख, जुबेर उपस्थित होते.

सर्व्हे नंबर 93 मधील अदनान युनिस पठाण याचे राहते घराची झडती घेतली असता तेथे एक लोखंडी तलवार, पांढ-या रंगाची लोखंडी तलवार, कुक्री, एक चॉपर, एक चाकु, एक लाकडी हॉकी स्टीक पोलिसांनी जप्त करून अदनान युनिस पठाण (वय 29, रा. सर्वे नं 93, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक), अमिर युनिस पठाण (वय 27, रा. शास्री नगर, पिंपळगाव नजिक, ता. निफाड, जि. नाशिक), अजय सत्तर राजपुत (वय 25, रा. इंदिरानगर, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक) यांनी बेकायदा सज्ञेय अपराध करण्याचे व विक्री करण्याचे उद्देशाने हत्यार ठेवले म्हणून लासलगाव पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम चार / 25 5 / 25 भारतीय न्याय संहिता कलम 3(5) याप्रमाणे फिर्याद दाखल केले आहे. 

अधिक पोलीस तपास पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, निफाडचे पोलीस उपधीक्षक डॉ. निलेश पालवे यांचे मार्गदर्शनाखाली लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group