नाफेडच्या तेरा केंद्रांमार्फत कांदा खरेदीला सुरुवात
नाफेडच्या तेरा केंद्रांमार्फत कांदा खरेदीला सुरुवात
img
Dipali Ghadwaje
 नाशिक  (प्रतिनिधी) :- केंद्र सरकारने नफेडमार्फत कांदा खरेदी ही मंगळवारपासून सुरू केली आहे नाशिक आणि नगर या दोन जिल्ह्यांमध्ये 13 केंद्रांवरती नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा हा नाफेडच्या मार्फत खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे आदेश हे सोमवारी रात्री उशिरा नाफेड प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार नाफेड प्रशासनाच्या वतीने मंगळवारपासून कांदा खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यात मिळून 13 केंद्रे सुरू करण्यात आली असल्याची माहिती नाशिक येथे नाफेडच्या वतीने देण्यात आली आहे. या ठिकाणी केंद्र शासनाने दिलेल्या भावाप्रमाणे कांदा खरेदी केली जात आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पिंपळगाव बसवंत येथे जाऊन नाफेडच्या केंद्राला भेट देऊन पाहणी केली आणि येथील कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group