Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्या समोर कांदा, टोमॅटो फेकले
Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्या समोर कांदा, टोमॅटो फेकले
img
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी) :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यामध्ये एका कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या ताफ्यासमोर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून टोमॅटो आणि कांदा फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे सरकारी यंत्रणांची एकच धावपळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने टोमॅटो व कांदा फेकणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील शेतीमालाच्या भावाचा प्रश्न अतिशय ज्वलंत बनला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात तीव्र भावना निर्माण झालेल्या आहेत. यापूर्वी 14 दिवस कांद्याचा प्रश्न पेटला व व्यापाऱ्यांच्या संपामुळे तो आणखीनच गंभीर बनला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला. टोमॅटोचे भाव अचानक पडल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली.

यासह जिल्ह्यात उत्पादन होणाऱ्या फ्लॉवर, पालेभाज्या यासह अन्य भाज्यांचे दरही सातत्याने कोसळत असल्यामुळे नाशिक जिल्ह्याची शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्याचाच फटका हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसला.

अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आले असताना ओझर विमानतळावर त्यांचे सकाळी साडेदहा वाजता आगमन झाले. त्यानंतर त्यांनी नियोजित कार्यक्रमाप्रमाणे कळवणच्या दिशेने जात असताना वणी या गावातील चौफुलीजवळ अचानक शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संतोष हिरे, तसेच श्याम हिरे या दोन कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून एकाने टोमॅटो व एकाने कांदा फेकून शेतकऱ्यांचा असणारा राग व्यक्त केला. अचानक ही घटना घडल्यानंतर सरकारी यंत्रणाची चांगलीच धावपळ झाली.

त्यामुळे तातडीने ताफा आला थांबविण्यात येऊन पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर हा ताफा पुढे गेला; परंतु यावर अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

इतर बातम्या
Join Whatsapp Group