नाशिक (प्रतिनिधी) :- कांद्यावरून आता स्थानिक बाजार समिती आणि नाफेड यांच्यामध्ये खरेदीवरून संघर्ष सुरू झाला असून आज नाशिकच्या स्थानिक बाजारपेठेमध्ये कांद्याला सरासरी पंचवीस रुपये भाव मिळाला तर दुसरीकडे मात्र नाफ्याने कांद्याचे भाव पाडल्यानंतर शेतकऱ्यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांची वाद घेतल्यानंतर पुन्हा दुपारी नाफेडला 2410 रुपये एवढा भाव द्यावा लागला. गुरुवारी झालेल्या या सगळ्या घडामोडीनंतर आता येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे भाव हे स्थानिक बाजार समितीमध्ये वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पुन्हा एकदा कांदा आता भाव खाणार हे स्पष्ट होत आहे. मधल्या काळात म्हणजे मागील पंधरा दिवसांपूर्वी केंद्र सरकारने नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि कांद्याची निर्यात मूल्य वाढवल्यानंतर संघर्ष सुरू झालेला होता. या संघर्षामध्ये बाजार समिती तसेच शेतकरी आणि व्यापारी या सगळ्यांनी एकत्रित होऊन सरकारशी संघर्ष केल्यानंतर शेवटी 240 रुपये हा जास्त भाव देऊन शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु हे सर्व घडत असताना दुसऱ्या बाजूला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नाफेडने आज दुपारी 136 ने आपल्या कांद्याचा भाव कमी केल्यानंतर शेतकरी संतप्त झाले होते.
गुरुवारी दुपारी नाफेडने 2275 रुपये एवढा भाव देण्याचा निर्णय घेतला. त्यावरून शेतकरी आणि नाफेडचे अधिकारी यांच्यामध्ये लासलगाव येथील केंद्रावर शाब्दिक चकमक झाली. त्या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यावेळी नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सुमारे दीड तासाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा 2410 रुपये भाव देऊन शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नाफेडच्या केंद्रावर कांद्याची लिलाव सुरू झाले. परंतु या ठिकाणी मात्र नाफेडला दुपारनंतर शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत होते.
दुसरीकडे आता नाफेडला स्थानिक बाजारपेठेंची संघर्ष करावा लागत आहे. कारण स्थानिक बाजारपेठांमध्ये म्हणजेच लासलगाव, पिंपळगाव, उमराणे, सटाणा या ठिकाणी गुरुवारी व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये लिलावात सहभागी होताना सर्व साधारण पंचवीस रुपये पर्यंतचा भाव हा शेतकऱ्यांना दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा हा नाफेड पेक्षा स्थानिक बाजारपेठेंमध्ये विकण्याचा कल दिसून येत होता.
यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत असल्याने शेतकरी स्थानिक बाजारपेठेत मिळाले लासलगावला गुरुवारी 2491 रुपये एवढा भाव देण्यात आला तर पिंपळगाव बसवंत येथे पंचवीसशे रुपये भाव देण्यात आला सटाणा येथे देखील 2481 च्या रुपयाच्या आसपास भाव देण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये चांगला भाव कांद्याला मिळू लागल्याने येणाऱ्या काही दिवसांमध्ये कांद्याचे भाव हे वाढण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.