लासलगाव ग्रामपंचायतीचे दिव्यांग बांधवांसाठी उल्लेखनीय पाऊल
लासलगाव ग्रामपंचायतीचे दिव्यांग बांधवांसाठी उल्लेखनीय पाऊल
img
दैनिक भ्रमर
पंचायत राज संस्थांच्या ५% निधीच्या वापरासंबंधी २५ जून २०१८ च्या शासन निर्णयानुसार लासलगाव ग्रामपंचायतीने दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. 

आज दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातील ५% निधीतून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ४,९५,०००/- इतका निर्वाह भत्ता गावातील ११० दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला. प्रत्येक लाभार्थ्यास ४,५००/- अशी रक्कम देण्यात आली आहे. मागील वर्षी ८० लाभार्थ्यांना प्रत्येकी ४,०००/- लाभ देण्यात आला होता, यावर्षी लाभार्थ्यांची संख्या व भत्ता वाढवण्यात आला आहे.

तसेच,२०२५-२६ या कालावधीत, दिव्यांग मिळकतधारकांना घरपट्टीत ५०% सवलत देण्यात येणार आहे. यावर्षी एकूण ५० लाभार्थ्यांना १,७७,६४८/- इतकी करसवलत मिळाली. याबाबत आवश्यक त्या मान्यता घेऊन तसेच आवश्यक कागदपत्राची पुरावे व पूर्तता संबंधित दिव्यांगा यांना लाभ देण्यात येईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group