लासलगावला शेतकर्‍यांनी कांदा लिलाव बंद पाडले
लासलगावला शेतकर्‍यांनी कांदा लिलाव बंद पाडले
img
दैनिक भ्रमर

लासलगाव (वार्ताहर) :- कांदा निर्यात बंदीचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येवला तालुक्यातील कातरणी येथील शेतकरी व छावा संघटनेचे नाशिक जिल्हा संघटक गोरख वाल्मीक संत यांचे हो मरण उपोषण सुरू असून प्रशासनाकडून कुठलीही दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी लासलगाव बाजार समितीतील कांद्याची लिलाव बंद पाडत कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच दोन तास ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. येत्या दोन दिवसांत या आमरण उपोषणाच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास थेट तहसीलदारांच्या दालनातच आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिला.

आज सकाळी पाचशे वाहनातील कांद्याचे लिलाव सुरु असतांना चारशे चौरेचाळीस  वाहनातील कांद्याचे लिलाव झाले असतांना अचानक काही कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी एकत्र येत कांदा निर्यात बंदी व व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करत कांदा लिलाव बंद पाडले यावेळी व्यापार्‍यांनी या आंदोलनकर्त्यांना विनंती केली की काही वाहनातीलच कांद्याचे लिलाव शिल्लक असल्याने एवढे लिलाव होऊ द्यावे मात्र शेतकर्‍यांनी याला विरोध करत व्यापार्‍यांनी लिलाव पुकारू नये असा इशारा देत कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा इशारा देत सर्व शेतकरी लासलगाव बाजार समितीच्या कांदा आवाराच्या प्रवेशद्वारावर जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले यावेळी बाजार समिती प्रशासन व पोलिसांची धावपळ झाली 

यावेळी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी या आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी गोरख संत यांचे आमरण उपोषण सुरू असून याची साधी प्रांत अधिकारी,तहसीलदारांनी दखल न घेतल्याने कांदा निर्यात बंदी बाबत हे आमरण उपोषण सुरू आहे हे राज्य आणि केंद्र सरकारला कसे कळणार यामुळे संतप्त होत कांद्याचे लिलाव बंद पाडून ठिय्या आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत हा ठिय्या आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी आपला रोष पोलीस अधिकारी वाघ यांच्याकडे व्यक्त केला यांची माहिती तहसीलदार यांना दिली असतात तहसीलदार शरद घोरपडे हे नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याने शेतकर्‍यांचा रोष निर्माण झाल्याने त्यांनी नायब तहसीलदार सुजाता वायळ यांना पाठवले.

यावेळी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी येत्या दोन दिवसात प्रशासनाच्या वतीने या अमरण उपोषण आंदोलनाची दखल न घेतल्यास थेट तहसीलदारांच्या दालनात सर्व शेतकरी कुटुंबासह येत आंदोलन करण्याचा इशारा नायब तहसीलदार सुजाता वायळ यांना दिला आपण येथे आले आहे कोण आमरण उपोषण करत हे आपल्या माहिती आहे का असा सवाल करत कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडला यावेळी अमरण उपोषणकर्ता गोरख संत तसेच शिवाजी राजे मोरे ,नवनाथ वैराळ, रोहिदास पवार, वैभव दळवी ,मनोरमा पाटील, सविता वाघ, रूपाली काकडे, विठ्ठल शेलार, सुहास वाघ ,गणेश निंबाळकर, वाल्मीक पुरकर यांनी भाषण करत केंद्र व राज्य सरकारला निशाणा केला 

या ठिय्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सभापती बाळासाहेब शिरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, माजी सभापती जयदत्त होळकर, संचालक डी के नाना जगताप, ललित दरेकर, डॉक्टर श्रीकांत आवारे, प्रवीण कदम ,बाळासाहेब दराडे, दत्तात्रय डुकरे उपस्थित होते तर तलाठी नितीन केदार,सचिव नरेंद्र वाढवणे, प्रकाश कुमावत, सुरेश विखे, पंकज होळकर यांनी शेतकर्‍यांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्याची विॅनती केली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पोलीस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group