विहिरीत पडलेल्या मोराला दिले जीवदान
विहिरीत पडलेल्या मोराला दिले जीवदान
img
दैनिक भ्रमर


जळगाव नेऊर (दीपक सोनवणे) :- येवला तालुक्यातील मौजे देशमाने येथील मच्छिंद्र शिंदे यांच्या ५० फूट विहिरीत पडलेल्या मोराला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून जीवदान दिले.

आज सकाळी मच्छिंद्र शिंदे यांच्या विहिरीत मोर पडल्याची माहिती वनविभागाला समजली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवून पडलेल्या मोराला जीवदान दिले. या विहिरीत दहा फूट पाणी होते. मोराला वैद्यकीय तपासणी करून भुलेगाव येथील जंगलात सुखरूप सोडण्यात आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर येथील भाऊसाहेब माळी, वनरक्षक पंकज नागपुरे, वाहनचालक सुनील भूरुक, ग्रामस्थ शरद गोरे यांनी मोराला जीवदान देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
इतर बातम्या
नाशिकमध्ये

Nashik :

Join Whatsapp Group