येवला प्रतिनिधी ( दिपक सोनवणे ) : दि . 21 ऑक्टोबर शनिवारी रात्रीच्या सुमारास येवला तालुक्यातील नगरसुल येथील कमोदकर वस्ती व शुक्ला वस्ती या ठिकाणी दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत जबरी लूट केली होती तसेच सात ते आठ नागरिकांना गंभीर जखमी केले होते. दरोडाच्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता.
नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून येवला तालुका पोलिसांना या दरोडेखोरांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचे पुरावे तांत्रिक विश्लेषण व श्वान पथकाची मदत अशी एकत्रित माहिती अभ्यासून घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या मळुबाई घाट येथून लखन जनार्धन पवार, राजू उर्फ( राजेंद्र दत्तू माळी), ज्ञानेश्वर त्रंबक मोरे, त्र्यंबकेश्वर मोरे, गणेश वसंत माळी, शरद सुभाष माळी अशा सहा जणांना अटक केली.
यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवत त्यांनी त्यांचे इतर साथीदार संजू दादा पवार (रा. नगरसुल), नामदेव नाथा गायकवाड (रा. पांजरवाडी तालुका येवला) आणि सोनू नानासाहेब गांगुर्डे (रा. धामोरी तालुका कोपरगाव ) अशा आणखी तीन जणांना अटक केली.
या दरोडा प्रकरणात आत्तापर्यंत एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दि. 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या कामगिरीचा आता सर्वत्र कौतुक होत असून तालुक्यात होणाऱ्या इतर भुरट्या चोरांचा देखील पोलिसांनी असाच तपास लावावा अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.
या कारवाईसाठी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मालेगाव, पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख मनमाड, आदींनी मार्गदर्शन केले असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पोलीस उपनिरीक्षक बहिर ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अडांगळे ,पोलीस नाईक सचिन वैरागर ,राजेंद्र बिन्नर ,पोलीस शिपाई आबा पिसाळ ,गणेश सोनवणे, गौतम मोरे ,मुकेश निकम, गणेश बागुल, प्रवीण थोरात ,पाल्हाळ पिंपळे व महिला पोलीस नाईक रणधीर आदींनी केली आहे.
दरम्यान या गुन्ह्यात आणखीन कोण कोण सहभागी आहे या टोळीने परिसरामध्ये किंवा इतर ठिकाणी काय काय कार्यवाही केल्या आहेत याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना दिली.