काही लोकं निर्लज्जपणे वाट्टेल तिथे रोमान्स करू लागतात. मग ते कॅफे असो की सार्वजनिक बस. लोकल ट्रेनमध्ये सुद्धा भर गर्दीत रोमान्स करणारे कपल दिसून येतात.
प्रायव्हेट टॅक्सीमधून प्रवास करत असताना प्रेमी युगलांना जणू जास्तच जोश चढतो. पण अशा कपलला रोखण्यासाठी एका टॅक्सी ड्रायव्हरनं भन्नाट कल्पना शोधली. अश्लिल प्रकार रोखण्यासाठी बंगळुरूमधील एक टॅक्सीवाल्यानं अनोखी शक्कल लढवली आहे. त्यानं आपल्या टॅक्सीमध्ये एक पोस्टरच लावले आहे. हे पोस्टर सध्या सोशल मीडिया वर चांगलेच व्हायरल होत आहे.
टॅक्सीवाल्यानं प्रेमी युगलांसाठी एक सूचना वजा इशारा देणारं पोस्टर सीटच्या मागे लावलं आहे. यावर लिहिलेय, “नो रोमान्स, ही एक कॅब आहे, तुम्ही गाडीमध्ये आहात तुम्ही कुठल्याही खासगी जागी किंवा ओयो हॉटेलमध्ये नाही. कृपया दोघांमध्ये सुरक्षित अंतर ठेवा आणि शांतपणे प्रवास करा.” समोर आलेल्या माहितीनुसार अन् जो कोणी या नियमांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न करतो त्याला या टॅक्सीमधून प्रवास करता येत नाही.