वसंत मोरेंची पुन्हा फेसबुक पोस्ट चर्चेत; पहा काय लिहिलंय त्यात...
वसंत मोरेंची पुन्हा फेसबुक पोस्ट चर्चेत; पहा काय लिहिलंय त्यात...
img
दैनिक भ्रमर
मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांनी विविध पक्षातील बड्या नेत्यांची भेट घेतली.

या भेटींनंतरही लोकसभा निवडणूक लढवण्यावर वसंत मोरे ठाम आहेत. त्यामुळे वसंत मोरे नेमके कुठल्या पक्षात प्रवेश करतात का? की अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढतात? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मोरे यांची राजकीय भूमिका काय असेल ते कोणत्या पक्षात जातात याची उत्सुकता सर्वांना आहे. काल रात्री पुन्हा वसंत मोरे यांनी फेसबुर पोस्ट शेअर केल्यानंतर हा सस्पेन्स आणखी वाढला आहे. एक व्हीडिओ शेअर करत वसंत मोरे यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. 

तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघोतच मी… असा मजकूर असलेली एक पोस्ट वसंत मोरे यांनी काल रात्री उशिरा फेसबुकवर केली. या पोस्टमध्ये वसंत मोरे यांनी एक व्हीडिओ शेअर केलाय. या व्हीडिओला असणारं बॅगराऊंड म्युझिक बरंच काही सुचवू पाहात आहे. देखीये जी ये शहर है तुम्हारा लेकीन इस शहर में दबदबा है हमारा…, असं बॅगराऊड असणारा व्हीडिओ आणि पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group