धक्कादायक : धावत्या रिक्षातील बॅटरीचा स्फोट अन् क्षणात सांगाडा ; नेमकं काय घडलं?
धक्कादायक : धावत्या रिक्षातील बॅटरीचा स्फोट अन् क्षणात सांगाडा ; नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
धावत्या रिक्षाच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्याकारणानं महिला प्रवाशाचा जळून मृत्यू झाला आहे. ही भयानक घटना बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये घडली आहे. घटनेच्यावेळी ऑटोमध्ये महिलेसोबत इतरही प्रवासी होते. या दुर्घटनेत त्यांनाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच सर्व जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल केलं. दरम्यान, इतर प्रवासी गंभीर असल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुबनीच्या खजौली येथील रस्त्यावर ही धक्कादायक घटना घडली. गयाघाट पोलीस स्टेशन परिसरात ऑटोच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. बॅटरीचा स्फोट झाल्यानंतर काही क्षणात ऑटोनं पेट घेतला. त्यामुळे ऑटोमधील प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्या.

मुख्य म्हणजे महिला आगीत जिवंत जळाली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल केले. मृत महिलेचं नाव कमरूल निशा असे असून, ती मधुबनी जिल्ह्यातील खजौली येथील डुमरियाही येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबाला याची माहिती दिली. पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत. या घटनेनंतर ही दुर्घटना नेमकी कशी घडली? याचा तपास सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group