'बाहुबली', 'थामा' की  'एक दीवाने की दीवानीयत 'रविवारी कोणी मारली बाजी ?
'बाहुबली', 'थामा' की 'एक दीवाने की दीवानीयत 'रविवारी कोणी मारली बाजी ?
img
वैष्णवी सांगळे
परेश रावल यांचा 'द ताज स्टोरी' आणि प्रभासचा 'बाहुबली'  हे चित्रपट ३१ ऑक्टोबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले आहेत. याआधी बॉक्स ऑफिसवर 'एक दीवाने की दीवानीयत' आणि 'कांतारा चॅप्टर १' देखील रिलीज झाला आहे. त्यामुळे या चारही चित्रपटांमध्ये तगडी टक्कर होताना दिसत आहे. 

दरम्यान , विकेंडला रविवारी कोणत्या चित्रपटाने बाजी मारली जाणून घेऊयात. चारही सिनेमांचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'एक दीवाने की दीवानीयत' बॉक्स ऑफिस कलेक्शन
'एक दीवाने की दीवानीयत' चित्रपटाने 60 कोटींच्यावर कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने रविवारी 3.75 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 64.40 झाले आहे. 

'द ताज स्टोरी' बॉक्स ऑफिस कलेक्शन
सॅकनिल्कच्या मीडिया रिपोर्टनुसार, 'द ताज स्टोरी'ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 2.21 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर ओपनिंग डेला 1 कोटी कमावले आहेत. तर दुसऱ्या दिवशी 1.9 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने वीकेंडला एकूण 5.11 कोटी रुपयांची कमाई केली.

'बाहुबली द एपिक' बॉक्स ऑफिस कलेक्शन
सॅकनिल्कच्या मीडिया रिपोर्टनुसार,'बाहुबली द एपिक' चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी रविवारी 6.30 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे एकूण कलेक्शन तब्बल 24.35 कोटी रुपये झाले आहे.

'थामा' बॉक्स ऑफिस कलेक्शन
आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि रश्मिका मंदाना यांच्या 'थामा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 120 कोटींची कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने दुसऱ्या रविवारी 4.25 कोटी कमावले आहेत.

movie |
इतर बातम्या
Join Whatsapp Group