बिहार निवडणूकीचा आज निकाल. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज या या निवडणुकांचा निकाल आहे. आतापर्यंतचे जे कल हाती आले आहेत, त्यानुसार भाजप आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळत आहे.
बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत सुमारे 1.5 कोटी महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये मिळाले आहेत. ही रक्कम कोणत्याही परतफेडीच्या बंधनाशिवाय थेट महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली, ज्यामुळे त्यांना स्वयंरोजगार सुरू करता आला आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होता आले.
बिहार निवडणुकीच्या तोंडावर ७५ लाख महिलांना प्रत्येकी १० हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा झाले. ही रक्कम मुख्यमंत्री महिला रोजगार योजना अंतर्गत देण्यात आली. या योजनेअंतर्गत, सुमारे 1.5 कोटी महिलांना कोणत्याही परतफेडीच्या बंधनाशिवाय 10,000 रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. आता हीच रक्कम बिहारमध्ये टर्निंग पाँईट ठरल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुकीचे वारे फिरले अगदी त्याचप्रमाणे बिहारमध्येही एन निवडणुकीच्या तोंडावर देण्यात आलेल्या या रकमेमुळे वारे फिरल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे.