धक्कादायक : डॉक्टरांनी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून केली रुग्णाची शस्त्रक्रिया ; 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक : डॉक्टरांनी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून केली रुग्णाची शस्त्रक्रिया ; 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
पाटणा : बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कथित डॉक्टर अजित कुमार पुरी यानं यू ट्यूब व्हिडीओ पाहून 15 वर्षांच्या मुलाचं किडनी स्टोनचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलाचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर  परिसरात एकच खळबळ उडाली आहे 

बिहारमधील कथित डॉक्टर अजित कुमार पुरी यानं यू ट्यूब व्हिडीओ पाहून 15 वर्षांच्या मुलाचं किडनी स्टोनचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला.  मात्र, यामुळं त्या मुलाची तब्येत बिघडली. यानंतर अजित कुमार पुरीनं त्या मुलाला रुग्णवाहिकेतून पाटणा येथे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्त्यात असताना त्या मुलाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना छपरा मधील गडखा येथील मोतीराजपूर येथील श्री गणपती सेवा सदनच्या नर्सिंग हॉस्पिटलमध्ये घडली.  या घटनेनंतर कथित डॉक्टर आणि त्याचे साथीदार फरार झाले आहेत. मुलाचा मृत्यू झाल्यानं त्याचे कुटुंबीय आक्रमक झाले होते.  

सारण जिल्ह्यातील गडखा भागातील कथित डॉक्टर अजित कुमार पुरी यानं यू ट्यूब व्हिडीओ पाहून मुलावर किडनी स्टोनचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. मुलाच्या नातेवाईकांनी दावा केला की डॉक्टर मोबाईलवर व्हिडीओ पाहत होता आणि ऑपरेसन करत होता. जेव्हा मुलाची प्रकृती बिघडली तेव्हा त्यानं स्वत:रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि पाटणाकडे रवाना झाला. मात्र, रस्त्यातच मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला. 

बिहारमदील या घटनेत भुवालपूर येथील चंदन साह यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. तर, अजित कुमार पुरी आणि त्याचे इतर साथीदार फरार झाले. बिहारमधील या घटनेनंतर मृत मुलाचे नातेवाईक मृतदेह घेऊन श्री गणपती सेवा सदन नर्सिंग होम येथे आले  आणि त्यांना जोरदार आक्रोश केला. यानंतर गडखा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला, त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. एसपी कुमार आशिष यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरु असल्याची माहिती दिली. 

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group