चांद्रयान-3 च्या यशानंतर आणि 2023 मध्ये देशातील पहिल्या सूर्य मोहिमेच्या प्रक्षेपणानंतर, भारत देशाच्या पहिल्या EXPOSAT मिशनसह नवीन वर्षाचे स्वागत करणार आहे. एक्सपोसेट क्ष-किरण स्त्रोत शोधण्यात आणि 'ब्लॅक होल' च्या रहस्यमय जगाचा अभ्यास करण्यात मदत करेल. हे अभियान सुमारे पाच वर्षे चालणार आहे.
साल २०२४ च्या पहिल्याच दिवशी इस्रोने एक्सपोसॅट या उपग्रहाची यशस्वी लाँचिंग केलीये. साल २०२४ मधील ही पहिलीच मोहीम असून ती यशस्वीरित्या पूर्ण झालीये.
सोमवारी (१ जानेवारी २०२३) रोजी ९ वाजून १० मिनिटांनी पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने XPoSat उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. पुढे सुमारे 22 मिनिटांमध्ये उपग्रह त्याच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित झाला. सदर उपग्रह अंतराळातील प्रमुख प्रकाश स्त्रोत तसेच कृष्णविवरे यांचा अभ्यास करणार आहे.
पीएसएलव्ही उपग्रह ६ डिग्री अँगलला प्रस्थापित करण्यात आलाय. पृथ्वीपासून सुमारे ६५० किलोमीटर उंच अंतरावर हा उपग्रह आहे. सध्या उपग्रह ज्या रॉकेटनेवर पाठला आहे त्याची कक्षा कमी करण्यात आलीये. पुढे आणखी काही वेळासाठी ही मोहीम सुरू राहणार आहे.
तिरुअनंतपुरम येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वूमेन’ने देखील एक उपग्रह विकसीत केला आहे. हा उपग्रह देखील ‘एक्स्पोसॅट’बरोबर प्रक्षेपित करण्यात आलाय. अतिनील किरणांचा निर्देशांक मोजणे आणि सौर विकिरण असा या उपग्रहाचा मुख्य उद्देश्य आहे. साल २०२४ मधील पहिलीच मोहीम यशस्वी झाल्याने इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.