भारताच्या गगनयान मोहिमेचा आढावा आणि भविष्यातील मोहिमांची रूपरेषा ठरविण्यासासंदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गगनयान मोहिमेच्या संशोधकांसोबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी संशोधकांना कामाला लागण्याचे आदेश दिले. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली. आदित्य L1 ही मोहिम देखील यशस्वी टप्प्यात आली आहे. यानंतर आता भारतीय अंतराळ संस्था ISRO ने गगनयान मोहिनेवर लक्ष केंद्रित केले आहे. 2035 मध्ये भारताचे स्वत:चे अंतराळ स्टेशन असले पाहिजे. तसेच 2040 पर्यंत मानव चंद्रावर असला असे टार्गेटच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ISRO ला दिले आहे.
यावेळी भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्टेशन उभारेल आणि २०४० मध्ये चंद्रावर पहिला भारतीय पाठवला जाणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ संशोधकांना दिले.
आदित्य एल १ आणि चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता गगनयान मोहिमेची तयारी करत आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेची महत्त्वाची चाचणी या महिन्यात केली जाणार असून या मोहिमेमुळे अंतराळातील अनेक रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. भारताचे संशोधक पहिल्यांदाच अंतराळात जाणार असल्यामुळे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलं आहे.
दरम्यान आज झालेल्या बैठकीत, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी गगनयानच्या क्रू मॉड्युल सिस्टिम, टिव्ही -डी १ ची पहिली चाचणी, त्यानंतर टिव्ही -डी २, टिव्ही -डी ३ आणि टिव्ही -डी ४ या सर्व चाचण्यांची सविस्तर माहिती नरेंद्र मोदीं यांना दिली. यावेळी मोदी यांनी, २०३५ पर्यंत भारताचे अंतराळ स्टेशन उभा करायचे आहे आणि त्यांनतर २०४० पर्यंत भारतीय अंतराळ संशोधक चंद्रावर पाऊल ठेवतील या उद्देशाने काम करण्याच्या सूचना शास्त्रज्ञांना केल्या.