चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियनच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रिटी पुढे सरसावले आहेत. सलमान खान, अक्षय कुमार, सोनू सूद, इंजरजीत सिंह, गुरमीत चौधरी यांसारख्या सेलिब्रिटींनी राजपालला मदत जाहीर केली आहे. यामध्ये आता प्रसिद्ध गायक मिका सिंहचाही समावेश झाला आहे. मिकाने राजपालला 11 लाख रुपयांची मदत केली आहे. राजपालला एकूण 9 कोटी रुपयांचं कर्ज फेडायचं आहे.
राजपाल यादवने गेल्या वर्षी देखील अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. ज्यामध्ये भूल भुलैय्याच्या फ्रेंचायजीपासून ते अक्षय कुमार, सलमान खान, वरुण धवण अशा अनेक मोठ्या स्टारसोबत गेल्या वर्षी राजपाल यादवने काम केलं, या वर्षी देखील तो अनेक मोठ्या चित्रपटांमधून झळकणार आहे, कर्ज वेळेत न फेडल्यामुळे सध्या राजपाल यादव जेलमध्ये आहे.
राजपाल यादवने आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये कॉमेडियनची भूमिका केली आहे. राजपाल यादवने आपल्या कामाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की राजपाल यादवचा अनुभव आणि कामाच्या तुलनेत त्याची फी एवढी जास्त नाहीये. वरुण धवनच्या बेबी जॉन चित्रपटामध्ये राजपाल यादवने भूमिका केली होती. या चित्रपटासाठी वरुणला 25 कोटी रुपये मिळाले होते, तर राजपाल यादवला या चित्रपटासाठी केवळ एक कोटी रुपयेच मिळाले होते, गेल्या चार ते पाच चित्रपटांमधून राजपाल यादवने केवळ 7 ते 8 कोटी रुपयांचीच कमाई केली आहे. 2023 ते 2025 या काळात राजपाल यादवने ‘कटहल’ एक कोटी रुपये, ड्रीम गर्ल 2′ एक कोटी रुपये, ‘भूल भुलैया 3’ दोन ते तीन कोटी रुपये, ‘चंदू चैम्पियन’ दोन कोटी रुपये एवढी कमाई केली आहे.