बॉलिवूडमधील कॉमेडी अभिनेता राजपाल यादव प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाकडून राजपाल यादवला मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने १८ मार्च पर्यंत राजपाल यादवला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी राजपाल यादव यांच्या वकिलांना अंतरिम जामिनासाठी प्रतिवादीच्या नावे 1.5 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट दुपारी 3 वाजेपर्यंत जमा करण्याचा अल्टिमेटम दिला होता. “रक्कम वेळेत जमा केल्यास सुटका करू, अन्यथा उद्या सुनावणी,” असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. यानंतर वकिलांनी 1.5 कोटींचा डीडी जमा केल्याची माहिती कोर्टाला दिली. त्यानंतर शाहजहांपूर येथे भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी राजपाल यादव यांना अंतरिम सुटका देण्यात आली. मात्र, त्यांना पासपोर्ट जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रकरणाची पुढील सुनावणी 18 मार्च रोजी होणार आहे.
बॉलिवूडमधील कॉमेडी अभिनेता राजपाल यादव सध्या 9 कोटी रुपयांच्या लोनशी संबंधित चेक बाऊन्स केसमध्ये 5 फेब्रुवारी 2026 पासून तिहार जेलमध्ये आहे. त्याने सरेंडर केल्यानंतरच जेलमध्ये पाठवले गेले.आता राजपाल यादवला जामीन मंजुर झाल्याचे समोर आले आहे.