फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा शेन वॉर्न आता हयात नाही. मात्र त्याच्या क्रिकेटमधील योगदानाने तो आजही अनेकांच्या मनात जिवंत आहे. हेच नाही तर आयपीएलमध्ये विक्री झालेला पहिला खेळाडू, राजस्थान रॉयल्स टीमचा पहिला कॅप्टन म्हणूनन शेन वॉर्न प्रचालित होता. दरम्यान शेन वॉर्नच्या एका छोट्या निर्णयाने त्याचे कुटुंब मालामाल होणार आहे.
छोटा निर्णय, मोठा बदल; शेन वॉर्नचे कुटुंब मालामाल
IPL 2026 सुरु होण्याआधी राजस्थान रॉयल्स टीमची 15300 कोटी रुपयात एक डील झाली आहे. पण यात शेन वॉर्नचा फायदा काय ? असा प्रश्न तुम्हांलाही पडला असेल. तर राजस्थान रॉयल्स टीम अमेरिका स्थित सोमानीने 1.63 बिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास 15,300 कोटी रुपये खर्च करुन विकत घेतली आहे. त्याचा फायदा शेन वॉर्नच्या कुटुंबाला कसा होईल?. त्याचं उत्तर आहे, शेन वॉर्नचा दूरदृष्टीचा विचार. त्याने भविष्याचा विचार करुन एक निर्णय घेतला होता. त्या बद्दल समजल्यानंतर लोक याला शेन वॉर्नचा मास्टरस्ट्रोक म्हणत आहेत.
शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सकडून IPL चे 4 सीजन खेळला. या दरम्यान त्याने प्रत्येक सीजनमध्ये 9.35 कोटी रुपये सॅलरी घेतली. त्याच्याशिवाय त्याने राजस्थान रॉयल्सकडे आणखी काहीतरी मागितलं होतं. ते म्हणजे फ्रेंचायजीत इक्विटी. शेन वॉर्नची दरवर्षी राजस्थान रॉयल्स टीममध्ये 0.75 टक्के इक्विटी होती. वॉर्न आयपीएलचे चार सीजन खेळला. म्हणजे 0.75 टक्के हिशोबाने राजस्थान रॉयल्समध्ये त्याची एकूण इक्विटी झाली 3 टक्के.
आता राजस्थान रॉयल्स टीमची 15300 कोटी रुपयात विक्री झाली आहे. याचा अर्थ 3 टक्क्याच्या हिशोबाने वॉर्नच्या वाट्याला 460 कोटी रुपये आले. आता हा सर्व पैसा त्याच्या कुटुंबाला मिळेल.