"या" राशींसाठी आजचा गुरुवार खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
img
Dipali Ghadwaje
आज कर्क राशीचे लोक त्यांच्या करिअर क्षेत्रात यश मिळवतील. तर आज मेष राशीच्या लोकांना सावधगिरीने आणि शहाणपणाने समस्यांना तोंड द्यावे लागेल. 
 सर्व राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया.

मेष  
आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांना आज मिटींगला उपस्थित राहावं लागेल, आज तुम्ही खूप चांगलं काम कराल. व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचे काही नवीन व्यावसायिकांशी संबंध प्रस्थापित होऊ शकतात, आजचा दिवस यशाचा असेल. व्यावसायिक आज खूप व्यस्त असतील. तरुणांनी आज नशेच्या सेवनापासून दूर राहावं, अन्यथा कुटुंबात तुमची बदनामी होऊ शकते.  

तुम्ही आता आता प्रेमात पडला असाल तर तुमच्या नात्याला थोडा वेळ द्या. नवीन नातं असेल तर नवीन नात्यात बोलून तुम्ही एकमेकांना समजून घ्याल आणि तुमची जवळीकही वाढू शकते. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज आहाराची विशेष काळजी घ्या. आंबट आणि मसाल्याचे पदार्थ खाऊ नका, अन्यथा तुमचे आरोग्य आणखी बिघडू शकते. आज तुम्ही जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल. आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.

वृषभ 
आज तुम्ही तुमचं काम वेळेवर पूर्ण करू शकाल आणि तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यातही यशस्वी व्हाल. आज तुम्ही तुमच्या कार्यालयातील कोणत्याही वादग्रस्त प्रकरणापासून दूर राहा, अन्यथा तुम्हीही या प्रकरणात अडकू शकता. रिअल इस्टेटशी संबंधित व्यावसायिकांमध्ये तणाव असू शकतो. फॅशनशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुमच्या कपड्यांची विक्री खूप जास्त असेल.

आज तुम्हाला खूप चांगल्या संधी मिळतील. तुमच्या वेळेचा सदुपयोग करा आणि तुमची प्रलंबित कामंही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही तुमच्या घरात काही बदल करू शकता आणि नवीन घर घेण्याचा विचारही करू शकता. सायटिका रुग्णांनी आज सतर्क राहावं, आरोग्याची काळजी घ्यावी आणि डॉक्टरांच्या सूचनेनुसार औषधं घ्यावीत.

मिथुन 
आजचा दिवस चांगला जाईल. काम करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस तुमच्या ऑफिसमध्ये सामान्य असेल. आज तुम्ही तुमच्या कार्यालयीन कामात थोडी सावधगिरी बाळगा, कार्यालयातील कोणतीही महत्त्वाची बाब बाहेरील व्यक्तीशी शेअर करू नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता आणि तुमचे वरिष्ठ तुम्हाला फटकारतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, तुम्ही तुमच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फेस्टिव्हलमध्ये नवीन स्कीम आणू शकता, यामध्ये तुम्हाला फायदा होईल. या स्किममुळे तुम्हाला सण आणि लग्नाच्या हंगामात अधिक कमाई करता येईल.

आज तुमच्या जोडीदाराशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका. सर्व प्रकारच्या मतभेदांपासून दूर राहा. जर तुमचा जोडीदार तुमच्यावर एखाद्या गोष्टीवरुन रागवला असेल तर तुम्ही त्याला लवकरात लवकर समजवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा दुरावा वाढू शकतो. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही कोणत्याही शारीरिक समस्येतून जात असाल तर तुम्ही अॅलोपॅथीच्या औषधांऐवजी आयुर्वेदिक औषधांची मदत घेऊ शकता. आज तुमच्या घरात काही धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, ज्यामध्ये तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल आणि तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.

कर्क 
आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये खूप काम करावं लागेल. व्यावसायिकांनी परदेशी कंपन्यांमध्ये काम केलं तर तुमचा व्यवसाय बुडू शकतो. तुम्ही तुमचे पैसे खूप विचारपूर्वक गुंतवा. तरुणांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मेहनत केली तर यश नक्कीच मिळते. आज तुम्ही तुमच्या अत्यंत कठीण विषयांची तयारी करण्यातही यशस्वी व्हाल. आज असे काहीही करू नका, ज्यामुळे तुमचे पालक तुमच्यावर रागावतील.

छोट्या-छोट्या आजारांकडेही दुर्लक्ष करू नका, त्याबाबत निष्काळजीपणा बाळगू नका, अन्यथा छोटे-छोटे आजारही मोठ्या आजाराचे रूप धारणं करू शकतात. आज तुम्हाला जास्त कामामुळे थकवा जाणवेल. जेव्हा तुम्ही थकलेले असाल तेव्हा जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा आणि कामात आळस दाखवू नका, आवश्यक तेवढीच विश्रांती घ्या.

सिंह 
आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणार्‍या लोकांनी आज थोडं ज्ञान आत्मसात करुन आणखी प्रगती केली पाहिजे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील, परंतु आज कोणताही व्यावसायिक प्रवास करू नका. तरुणांनी करिअरमध्ये येणाऱ्या आव्हानांबद्दल थोडं सावध राहा आणि सावधगिरीने समस्यांना तोंड द्या.

आज तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराला खूप महत्त्व देण्याचा प्रयत्न करा, त्यांचे ऐका आणि त्यांच्याशी बोला. कोणत्याही गोष्टीवर रागवू नका. तुमच्या घरात शांतता राखण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. आज एखाद्या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली असेल, तर ती चांगल्या प्रकारे पार पाडा. आज कोणत्याही गोष्टीवर जास्त रागावू नका, अन्यथा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

कन्या  
आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणारे लोक त्यांच्या कामाने वरिष्ठांना खुश करू शकतात. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूश होऊन तुमचे नाव गुड बुकमध्ये लिहीतील आणि तुमचा पगारही वाढवू शकतात, यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. व्यावसायिकांचा व्यवसाय आज चांगला चालेल. तरुणांनी आपल्या ज्येष्ठांनी दिलेल्या सल्ल्याचे शांततेने पालन करावे.

घर आणि जमीन खरेदीसाठी आजचा काळ तुमच्यासाठी अतिशय योग्य असेल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, आज स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल. अति थंडीमुळे तुम्हाला त्रास उद्भवू शकतात. तुमचा आहार साधा ठेवा. चिंतामुक्त राहा, संभ्रमात असताना तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीची मदत घेऊ शकता. कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत बसा आणि चर्चा करा.

तूळ 
नोकरदारांना आज नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. कपड्यांच्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानातील ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात ठेवल्या पाहिजेत, कारण फॅशनच्या या युगात लोकांच्या आवडीनिवडी खूप वेगाने बदलतात आणि त्यामुळे तसे कपडे ठेवणं गरजेचं आहे. तरुणांबद्दल बोलायचे झाले तर, आज तरुण आपले विचार पालकांसोबत शेअर करू शकतात, यात अजिबात संकोच करू नका. तुमच्या सर्व समस्या त्यांच्या सल्ल्याने सोडवल्या जातील.

आज तुमच्या कुटुंबात तुमच्या मुलाच्या लग्नाबाबत काही चर्चा होऊ शकते. मुलांच्या लग्नासाठी योग्य वय विचारात घेतले पाहिजे. आरोग्याच्या बाबतीत, आज तुमचे आरोग्य कमजोर राहील. जास्त कामामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा संभ्रम असेल तर धार्मिक कार्यात मन एकाग्र करा आणि एखाद्या मंदिरात जा, तुमच्या मनाला शांती मिळेल. 

वृश्चिक 
आजचा दिवस थोडा त्रासदायक असू शकतो. नोकरदार लोकांबद्दल सांगायचे तर, कामाच्या ठिकाणी त्याच त्याच चुका वारंवार करत राहिल्यास तुमचा बॉस तुमच्यावर नाराज होऊ शकतो आणि तुमचे काम दुसऱ्याकडे सोपावले जाऊ शकते, यामुळे तुम्हाला खूप दुःख होईल. पण तुम्ही तुमच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मजा करू शकता, पण तुम्ही लक्षात ठेवा की हसणे आणि एखाद्यावर विनोद करणे हे काही मर्यादेपर्यंत मर्यादित असावे, अन्यथा, तुमचे मित्र तुमच्यावर रागावतील.

जर तुमच्या घरात एखादा प्राणी असेल तर तुम्ही त्याच्या खाण्याची योग्य काळजी घ्यावी. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आनंद वाढवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही कुटुंबातील लहान कार्यक्रमांत सहभागी झालात तर तुमचे कुटुंबीय तुमच्यावर खूप आनंदी होतील. आरोग्याबाबत गाफील राहू नका, अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते. 

धनु 
आजचा दिवस थोडा सावध राहण्याचा असेल. नोकरी करणाऱ्यांनी त्यांच्या कामाबाबत सतर्क राहावे, जेणेकरून तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर रागावणार नाहीत. तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, तरच तुम्हाला बढती मिळू शकते आणि तुमचा पगारही वाढू शकतो. व्यवसायिकांना व्यवसायात काही बदल करायचे असतील तर ते वेळेनुसार करा आणि त्यासाठी तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. तरुणांबद्दल बोलताना, तरुणांनी कोणत्याही प्रकारचा आळस मनात येऊ देऊ नये, आजचे काम आजच करण्याचा प्रयत्न करा.

सकाळी उठण्याची आणि रात्री झोपण्याची नियमित वेळ तुम्ही ठरवली पाहिजे. उशिरा झोपू नका. झोपायला लवकर जा आणि लवकर उठा, नाहीतर तुम्ही आयुष्यात मागे पडाल. आज तुम्ही घराबाहेर पडा, लोकांना भेटा आणि नवीन मित्र बनवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवा, यामुळे तुमचा मूड चांगला राहील. 

मकर 
सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना आज ऑफिसमध्ये ट्रान्सफर लेटर मिळू शकते, यासाठी तुम्ही तयार राहा. तुम्हाला कधीही दुसऱ्या ठिकाणी नोकरीला जावे लागेल. व्यावसायिकांबद्दल सांगायचे तर, व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायात अधिक पैसे मिळवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नये, असे करणे तुमच्यासाठी चांगले राहणार नाही. 

तरुणांना नोकरीच्या बाबतीत काही चांगली बातमी मिळू शकते. आज तुमच्यापेक्षा मोठ्या लोकांशी संपर्क ठेवावा. वडिलधाऱ्यांचा सल्ला तुम्हाला भविष्यात खूप उपयोगी पडेल, त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आज तब्येतीची काळजी घ्या.

कुंभ  
आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल सांगायचं तर, जर तुम्ही तुमची जुनी नोकरी सोडली असेल तर आज तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी चांगलं वागलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत तुमच्या नवीन ऑफिसचे काम समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांना आज व्यवसायात चांगला आर्थिक लाभ मिळेल.

आज जर तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली तर तो नक्कीच घालवा, त्यांच्यासोबत बसा आणि तुमच्या आयुष्यातील गोष्टी शेअर करा, ज्यामुळे तुमचा मानसिक ताणही कमी होईल. तुमच्या आरोग्याविषयी बोलताना, खांदेदुखी किंवा पोटदुखी तुम्हाला वारंवार त्रास देत असतील तर तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

मीन  
नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमधील एखादं कठीण काम करण्यासाठी तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांचे सहकार्य खूप फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, सोने-चांदीचे व्यापारी आज आनंदी दिसतील. लग्नाच्या हंगामात दागिन्यांची खरेदी थोडी जास्त असू शकते, यामुळे तुम्ही समाधानी राहाल. तरुणांनी आज दुसऱ्याच्या वादात पडू नये, अन्यथा हा वाद तुम्हाला महागात पडू शकतो. इतरांच्या वादापासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले राहील.

आज तुमच्या कुटुंबात एखाद्या विषयावरुन तणावाचे वातावरण असू शकते, त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी आज नीट राहावे. कोणीही वाद घालू नये. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, आज दम्याच्या रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. धुके आणि कडाक्याच्या थंडीत त्यांनी घराबाहेर न पडल्यास बरे होईल.

(टीप : वरील सर्व बाबी दैनिक भ्रमर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक भ्रमर कोणताही दावा करत नाही.)

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group