आज 04 जानेवारी 2025, शनिवारचा दिवस. आजचा दिवस शनीदेवाला समर्पित आहे. तसेच, आजचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास
आज जे जे अवघड आहे ते सोपे करून काम कराल.
वृषभ रास
लांबच्या प्रवासाचे योग येतील. स्थावर इस्टेटिसंबंधीचे व्यवहार काही कारणामुळे रखडतील.
मिथुन रास
कामाचा लाभ मिळेल परंतु त्यासाठी थोडा मानसिक त्रासही सहन करावा लागेल.
कर्क रास
विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल फक्त एकाग्रता थोडी कमी पडेल.
सिंह रास
वैवाहिक जीवनात समजुतीचे वारे वाहतील. महिलांनी स्वतंत्र वृत्तीला आळा घालावा.
कन्या रास
आज दिवस आनंदात जाईल आर्थिक स्थिती सुधारेल.
तुळ रास
बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे हातात पडतील संशोधन क्षेत्रात यश मिळेल.
वृश्चिक रास
एखादी गोष्ट दुसऱ्याने सांगितली म्हणून मान्य करू नका स्वतः विचार करा.
धनु रास
स्वतःच्या बुद्धीच्या परिसावर घासून तिचा कस लावण्याची सवय तुमच्या कामाला न्याय देणारी ठरेल.
मकर रास
घरापासून लांब राहण्याचे योग येतील प्रकृतीला मात्र सांभाळा.
कुंभ रास
शासनाचे विकार पाठीचे दुखणे असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
मीन रास
कर्तव्य आणि शिस्त यांना धरून राहिलात तर कोणालाही घाबरायचे कारण नाही.