आज श्रावणातील पहिला सोमवार; आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा
आज श्रावणातील पहिला सोमवार; आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा
img
Dipali Ghadwaje
आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. 

मेष रास  

नोकरी - ऑगस्ट महिन्यातला पहिल्याच सोमवारच्या दिवशी तुम्हाला कामाच्या ठिकाणी फार मेहनत घ्यावी लागेल. तरच, तुम्हाला यश मिळू शकतं. 

व्यापार  - तुमचा व्यवसाय सामान्य चालेल फक्त तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. 

तरूण  - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी जास्त फोकस करण्याची गरज आहे. 

आरोग्य  - आज तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शारीरिक कष्ट करावं लागणार नाही. 

वृषभ रास 

नोकरी - आज तुम्ही थोडं सावध राहा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मागील कामांची यादी ठेवावी, कारण तुम्हाला त्याबाबत विचारलं जाऊ शकतं. तुम्ही तुमची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.

व्यवसाय  - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सामान्य असेल. आज तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल.

विद्यार्थी - एखाद्या मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण तुम्हाला मिळू शकतं, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.

आरोग्य  - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जास्त त्रास होणार नाही. डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करत राहा.

मिथुन रास

नोकरी - कामातील यश पाहून तुमच्या मनात अहंकार निर्माण होऊ शकतो, म्हणून तुम्ही तुमचा अहंकार सोडून कामात आणखी यशस्वी कामगिरी करण्याचा प्रयत्न करा.

व्यवसाय  - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो.

विद्यार्थी  - तरुणांनी आज गरजूंच्या मदतीसाठी पुढे आलं पाहिजे, तुम्हाला त्यांचे खूप आशीर्वाद लाभतील. आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असेल. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरी घालवायला आवडेल.

आरोग्य  - जे वैद्यकीय क्षेत्रात जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांना त्यांच्या अभ्यासाचं वेळापत्रक वाढवावं लागेल. जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा कमी मेहनत केली तर तुम्हाला यश मिळणार नाही. जर तुम्हाला एकटं वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या भावंडांसोबत वेळ घालवू शकता.

कर्क

नोकरी  - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे निभावाल, कारण काम चुकलं तर तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे विरोधक याचा फायदा घेऊ शकतात. 

व्यवसाय - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं विकणं टाळावं लागेल, अन्यथा तुम्ही एखाद्या संकटात सापडू शकतात. तुम्ही काही बिनबुडाच्या आरोपातही अडकू शकता. 

विद्यार्थी  - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही मोठ्यांचा आदर केला पाहिजे, त्यांना उलटं बोलू नका. आज जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिला पाहिजे.

आरोग्य - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज पचायला हलकं अन्न खा, नाहीतर तुमचं पोट खराब होऊ शकतं, त्यामुळे सहज पचणारं अन्न खावं. 

सिंह  

नोकरी - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामासाठी काही ट्रेनिंग घेण्याचा विचार करू शकता, ट्रेनिंगसाठी तुमचा वेळ चांगला असेल.

व्यवसाय  - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, व्यापाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चांगलं वागावं लागेल, कारण त्यांना देखील तुमच्याकडून चांगल्या शब्दांच्या अपेक्षा असतात. चांगले संबंध ठेवल्यास ते चांगलं काम करतील आणि तुमचा व्यवसाय नफ्यात राहील.

विद्यार्थी  - विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही, तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. आज तुम्ही भविष्यातील योजनांवर खूप विचाक करू शकता. 

आरोग्य  - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका, अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्ही खूप चिंतेत असाल.

कन्या  
नोकरी   - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही मोठ्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तिथे नोकरीही मिळू शकते, यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही.

व्यवसाय   - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यावसायिकांनी आपल्या पैशाच्या व्यवहाराबाबत थोडं सावध राहिलं तर बरं होईल, कारण पैशाच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आज एखादा ग्राहक पैशांबाबत तुमची फसवणूक करू शकतो.

विद्यार्थी   - तरुणांनी आज प्रतिकूल परिस्थितीसाठी स्वतःला तयार केलं पाहिजे, कारण जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार होत नाही. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं.

आरोग्य  - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर आरोग्याची काळजी घ्या, जास्त वजन उचलू नका. खूप थंड अन्न खाणं टाळलं तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन राखलं पाहिजे. 

तूळ 
नोकरी - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काम करताना तुमच्या डोक्याचा खूप वापर करावा लागेल. तुमच्या बुद्धीने तुम्ही अनेक कामं पूर्ण कराल.

व्यवसाय  - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यापारी वर्गाने आज कोणत्याही प्रकारचं कर्ज घेणं टाळावं, कारण ग्रहण बदलल्यामुळे तुमच्या जीवनात कर्जाबाबत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

विद्यार्थी- तुमच्या परीक्षा जवळ आल्या असतील तर तुम्ही परीक्षेची तयारी अधिक जोमाने करायला हवी.

आरोग्य - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, दमा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांना आणखी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, म्हणूनच तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत थोडं सतर्क राहिलं पाहिजे. 

वृश्चिक 

नोकरी - आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग करणाऱ्या लोकांवर आज कामाचा ताण खूप वाढू शकतो, तो चांगल्या प्रकारे सांभाळणं तुमच्यासाठी एक आव्हान असेल. बाकीच्यांना ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात.

व्यवसाय  - व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचं तर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यापारी आज चांगली सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतात. ग्राहकांची संख्या वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल, तुमच्याकडे जेवढे ग्राहक असतील तेवढा तुमचा व्यवसाय उत्तम चालेल.

विद्यार्थी - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, आज त्यांना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पण तुम्ही तुमच्या बुद्धीने या समस्यांवर सहजतेने मात कराल, आज तुमचा पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने खूप खर्च होऊ शकतो.

आरोग्य  - आजार किरकोळ असो किंवा मोठा आजार, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल बेफिकीर न राहिल्यास बरं होईल. किरकोळ समस्या आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

धनु 
नोकरी - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज तुम्हाला ऑफिसला जाण्याचा फायदा मिळू शकतो. तसेच, तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील, ते तुमच्यावर खूश असतील आणि तुमचा पगार वाढवतील.  

व्यवसाय - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ चांगला असेल. आज तुम्ही जी कोणती डील कराल त्यात तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळू शकेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.

विद्यार्थी - तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळतील आणि आईवडिलांकडून तुम्हाला फटकारलं जाऊ शकतं.

आरोग्य- तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. पोटदुखी किंवा खोकल्याची समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते, त्यामुळे अगदी क्षुल्लक समस्या असतानाही निष्काळजीपणा करू नका, उलट डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मकर 
नोकरी  - आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज ऑफिसचं काम करताना घाई करू नका, कारण घाईत केलेलं काम बिघडू शकतं आणि त्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्याशी भांडू शकतात.

व्यवसाय  - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यवसायासाठी तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

विद्यार्थी  - आज तुम्ही कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नये, अन्यथा तो तुमचा विश्वासघातही करू शकतो.

आरोग्य  - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल. 

कुंभ 
नोकरी   - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज टेक्नोलॉजीचा वापर करुन ऑफिसचं काम पूर्ण करा, असं केल्याने तुमच्या कामाचा दर्जा सुधारेल. आज वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील, ज्यामुळे तुमचं मन आनंदी होईल.

व्यवसाय  - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्याशी नवीन ग्राहक जोडले जातील.

विद्यार्थी   - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा. त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, जे त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल.

आरोग्य  - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल.

मीन  
नोकरी - तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला कामात मदत करतील, आज तुमचं मन कामात गुंतलेलं असेल.

व्यवसाय  - व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचे तर, जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्ही आधी चर्चा करा आणि मगच नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवा, कारण तुमचा पार्टनर तुम्हाला पुढे फसवू शकतो. हा निर्णय तुमच्या व्यवसायासाठी चांगला असेल.

विद्यार्थी - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं, आज तुम्ही तुमचा शाळेचा गृहपाठ पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून ओरडा पडेल.

आरोग्य  - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी दैनिक भ्रमर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक भ्रमर कोणताही दावा करत नाही.)

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group