मेष रास
आज तुम्ही रोजगाराच्या दिशेने काम करत असाल तर चांगल्या संधी मिळतील. ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला असेल. भविष्यात तुम्हाला फायदे होतील. नोकरी व्यवसायात डील फायनल होईल. मित्राच्या समस्यावर तोडगा काढाल.
वृषभ रास
आजचा दिवस थोडा जोखमीचा असेल. गरजेनुसार धोका पत्करावा लागेल. जास्त जोखमीचे काम केल्याने नुकसान सहन करावे लागेल. पैशाच्या बाबतीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस कठीण असेल. रखडलेली रक्कम मिळविण्यात अडचणी येतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल.
मिथुन रास
आज कामाच्या ठिकाणी काही बदल केले तर नक्की लाभ होतील. मुलांच्या भविष्याविषयी चर्चा कराल. पालकांशी महत्त्वाच्या विषयावर बोलाल. जोडीदाराचा सल्ला घ्याल. विवाहयोग्य लोकांकडून चांगले विवाह प्रस्ताव येतील.
कर्क रास
कुटुंबातील समस्या त्रास देतील. काही अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागेल. मोठ्यांच्या मदतीने काही समस्या सोडवाल. कामात सहकाऱ्यांशी वाद होतील. तुमचा मूड खराब असेल. नुकसान होण्याची शक्यता आहे.
सिंह रास
आज कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. शुभ कार्यक्रमाबाबत चर्चा होऊ शकते. कुटुंबातील सर्व सदस्य उत्साहाने सहभागी होतील. धार्मिक कार्यात पैसे खर्च कराल. प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी ऐकू येईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
कन्या रास
आज तुमचे नशीब उंचावेल. मालमत्ता खरेदी करण्यासाठी दिवस चांगला आहे. भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होईल. नात्यात तणाव निर्माण होईल. पार्टनर तुमच्यावर रागवू शकतो. कामात मेहनत घेतल्यावर यश मिळेल.
तुळ रास
तुमचे मन आज शांत असेल. तुम्हाला आज त्रास जाणवू शकतो. सरकारी वादात आज यश मिळेल. कुटुंबातील सदस्य पार्टीचे आयोजन करु शकतात. सासरच्या मंडळींशी वाद होतील. मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील.
वृश्चिक रास
आज शुभ कार्यात तुमची रुची वाढेल. निर्णयातून भविष्यात फायदा होईल. भावांमधील तणाव आज संपेल. कर्ज घेऊ नका, संकटात सापडाल. वडिलांना डोळ्याचे आजार उद्भवतील.
धनु रास
आज कुटुंबातील सदस्याशी वाद होऊ शकतो. बोलण्यात गोडवा कायम ठेवावा. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. उत्पन्न लक्षात घेऊन पैसे खर्च करा.
मकर रास
आजचा दिवस नोकरीत इच्छित परिणाम देईल. कामात वातावरण चांगले असेल. महत्त्वाचे काम पुढे ढकलू नका. अडचणीत सापडू शकता. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल.
कुंभ रास
आज तुम्हाला सासरच्या लोकांकडून लाभ होतील. अडकलेले पैसे मिळू शकतात. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा.
मीन रास
आज काम नव्या उमेदीने कराल. काही नवीन प्रयोग केल्यास नक्की फायदा होईल. भविष्यातसंबंधित महत्त्वाचा निर्णय घ्याल. पालकांचा सल्ला घ्या.कायदेशीर वादात अडकण्याची शक्याता आहे.